आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण अखेर थांबली, जिल्हा परिषद अध्यक्षांचा पुढाकाराने कन्या शाळेला मिळाली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिव्यमराठीच्या वृत्ताने अधिकाऱ्यांना जाग

औरंगाबाद- विद्यार्थ्यांनी नियमित पाणी प्यावे म्हणून अनेक शाळांत "वॉटर बेल'' उपक्रम राबवण्यात येत आहेत, मात्र जिल्हा परिषदेच्या भिंतीलगतच असलेल्या जि.प. कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना मागील सहा महिन्यांपासून पाण्यासाठी इकडे-तिकडे भटकावे लागत असल्याचे वृत्त दिव्य मराठीने  प्रकाशित  केले होते. या वृत्ताची दाखल घेत जि. प. अध्यक्ष ऍड.देवयानी पाटील डोंगवकार यांनी विशेष लक्ष देत जि.प. परीषेदच्या सिंचन विभागातूनच शाळेसाठी पाण्याची सोय केली . तसेच मनपा कडेही पाठपुरावा सुरू केला आहे.जिल्हा परिषदेच्या शेजारीच जि.प. कन्या शाळा आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेने शाळेचे पाणी बंद केल्यामुळे विद्यार्थिनींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. मधल्या सुटीत विद्यार्थ्यांना पाण्यासाठी कधी जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन किंवा जिथे मिळेल तिथे पाणी प्यावे लागत होते. तर काही विद्यार्थ्यांना पाण्याची बाटली भरून आणण्यासाठी घरीही जावे लागते. त्यातून त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत होते.  हे वृत्त दिव्य मराठीने प्रथम प्रकाशित केले.ही बाब जिल्हा परीषद अध्यक्ष डोणगावकर यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने महापालिकेकडे चौकशीची ग्वाही दिली.मुख्याध्यापिकांशी चर्चा ही केली. सध्या महापालिकेकडे पाणीपुरवठ्यासाठी पाठपुरावा सुरु असला तरी, सध्या जि.प.च्या सिंचन विभागाकडून पाईप द्वारे शाळेला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच शाळेत मुलांसाठी पाण्याचे जार आणून ठेवण्यात आले आहेत. असे मुख्याध्यापिका ताझिंन फातेमा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...