आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळाले यश, वर्गात सोमवारपासून शिकवायला येणार शिक्षक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रलंबित मागण्यांसाठी आणि स्वहितासाठी अनेक संघटना आणि शिक्षक आंदोलन करतात. पण आम्हाला शिकवायला शिक्षक द्या, आम्हाला पण आफिसर बनू द्या, म्हणून शाळेला शिक्षक मिळवण्यासाठी, त्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, असा पावित्रा घेत जि.प.च्या उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनात आंदोलन केले होते.

 

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आले असुन त्यांच्या शाळेवर जि.प. प्रशासनाकडून दोन शिक्षक रूजू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशाला कसाबखेडा(ता. खुलतबाद) येथील उर्दू माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात 45 आणि नववीच्या वर्गात 52 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संचमान्यता दुरुस्तीनंतर इयत्ता आठवी व नववीसाठी पदे मंजूर होणे आवश्यक होते, परंतु उर्दू माध्यमाचे फक्‍त एक पद मंजूर करण्यात आले आहे. शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या अधिक आहे; मात्र, शिकवायला शिक्षकच नव्हते.

 

शिकण्यासाठी शिक्षक देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी 9 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात शाळा भरवत आंदोलन केले होते. या विद्यार्थ्यांना दोन शिक्षक देवु असे अश्‍वासन अॅड. देवयाणी डोणगावकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.बी.चव्हाण यांनी दिले होते. आंदोलनानंतर दहा दिवसांनी 18 जुलै रोजी जि.प. प्रशासनाने दोन शिक्षकांना रुजू होण्यासंदर्भात ऑर्डर  दिली. त्यानंतर 20 जुलै रोजी सिमा बेगम बाहायुद्दीन या शाळेवर रूजू झाल्या आहे. तर असरा जबीन या सोमवारी (दि.22) जुलै रोजी शाळेत रुजू होणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.