Home | Business | Business Special | Zuckerberg dismisses Facebook's demand for division;

झुकेरबर्ग यांनी फेसबुकच्या विभागणीची मागणी फेटाळली; व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम व मेसेंजर या वेगवेगळ्या कंपन्या कराव्यात क्रिस ह्यूज यांचे मत

वृत्तसंस्था | Update - May 13, 2019, 08:49 AM IST

फेसबुकच्या सुरक्षेवरील आर्थिक तरतूद एक दशकापूर्वी कंपनीच्या एकूण महसुलापेक्षा जास्त आहे

  • Zuckerberg dismisses Facebook's demand for division;

    लंडन - फेसबुकचे सीईआे मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या कंपनीची विभागणी करण्यास नकार दिला आहे. त्यांनी सांगितले की, फेसबुकचा विशाल आकार वास्तवात तिचे वापरकर्ते व लाेकशाही प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी फायदेशीर आहे. फेसबुकच्या सुरक्षेवरील आर्थिक तरतूद एक दशकापूर्वी कंपनीच्या एकूण महसुलापेक्षा जास्त आहे.

    फ्रान्सच्या दाैऱ्यावर आलेल्या झुकेरबर्ग यांनी एका मुलाखतीत ही टिप्पणी केली. झुकेरबर्ग यांचे जुने मित्र व फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूज यांनी कंपनी प्रमुख झुकेरबर्ग आवश्यकतेपेक्षा जास्त शक्तिशाली झाल्याचा इशारा दिला हाेता. त्यामुळे फेसबुकची विभागणी करणे गरजेचे आहे,असे त्यांनी मत व्यक्त केले हेाते. याचा अर्थ फेसबुकची वेगवेगळ्या कंपन्यांत विभागणी करायला हवी, असा हाेताे. म्हणजे, व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम व मेसेंजर या वेगवेगळ्या कंपनी केल्या पाहिजेत. सध्या त्या फेसबुकच्या सहयाेगी कंपन्या आहेत. साेशल मीडियात दबदबा राहावा राहावा यासाठी फेसबुक प्रतिस्पर्धी कंपन्यांची एकतर खरेदी करते किंवा त्यांची नक्कल करते,असे ह्यूज यांनी म्हटले हाेते.

Trending