आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनात सुधारणा करणारी अहिंसेची 10 सूत्रे:आपण हे 10 विचार आचरणात आणले तर जीवन समृद्ध होईल, अहिंसेचा प्रसार होईल

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर स्वामींची ही मूर्ती राजस्थानमधील करौलीच्या येथील आहे. त्यांच्या बहुतांश मूर्ती तपश्चर्येच्या मुद्रेतील आहेत. ही तपश्चर्या अहिंसेच्या साधनेची होती. कोणत्याही जीवाची हिंसा करू नका, हृदयात नेहमी दयाभाव ठेवा, असा त्यांचा संदेश होता. - Divya Marathi
अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर स्वामींची ही मूर्ती राजस्थानमधील करौलीच्या येथील आहे. त्यांच्या बहुतांश मूर्ती तपश्चर्येच्या मुद्रेतील आहेत. ही तपश्चर्या अहिंसेच्या साधनेची होती. कोणत्याही जीवाची हिंसा करू नका, हृदयात नेहमी दयाभाव ठेवा, असा त्यांचा संदेश होता.

अहिंसा हा केवळ शब्द नाही, तर ती जीवनपद्धती आहे. अहिंसेची भावना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असते, फक्त ती ओळखण्याची व अधिकाधिक अंगीकारण्याची गरज आहे. यामुळे तुमच्या जीवनात सुधारणा होईल व अहिंसेचा प्रसारही होईल…

१) सर्वांना हसतमुखाने भेटा, त्यामुळे आदर वाढतो
तुम्ही हसता तेव्हा फक्त तुम्हालाच नाही, तर तुम्हाला हसताना पाहणाऱ्या लोकांनाही फायदा आणि आनंद होतो. हसणे हे संसर्गजन्य आहे आणि हसतमुखाने भेटणे हा अहिंसेचा सर्वात मूलभूत आणि सोपा प्रकार आहे. त्यामुळे तुमचे स्मित दररोज जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. आपण हसतमुखाने स्वागत करतो तेव्हा आदर वाढतो आणि आपल्याबद्दल चांगली भावना निर्माण होते.

२) आपली चूक मान्य करा, इतरांना माफ करा
आपल्या चुकांसाठी माफी मागितल्याने आणि दुसऱ्याची चूक माफ केल्याने मनावरील ओझे दूर होते. हे अपराधीपणा आणि न्यूनगंडापासून मुक्तता देते. परस्पर सामंजस्य वाढते. याचा फायदा केवळ एका व्यक्तीला नव्हे, तर संपूर्ण समूहाला होतो. समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होते. तुम्ही हिमतीने तुमची चूक सुधारून त्याबद्दल माफी मागता तेव्हा अहिंसेचा प्रसारच होतो.

३) इतरांची प्रशंसा करा, एखाद्याला प्रोत्साहनही द्या
आपण एखाद्याची प्रशंसा केल्यामुळे लोकांना पुढे जाण्यास मदत होते. म्हणून लोकांचे वैयक्तिक गुण, कर्तृत्व आणि कामे यांची प्रशंसा करा. योग्य भावनेने बोललेले कौतुकाचे दोन शब्द तुमच्याबद्दल चांगली भावना निर्माण करतात. एखाद्याचे कौतुक करण्यासाठी त्याचे चांगले गुण पाहावे लागतात, यामुळे तुमच्यामध्ये योग्य आणि अयोग्य फरक करण्याची भावना विकसित होते.

४) इतरांना मदत करतात त्यांना धन्यवाद म्हणा
कोणी तुम्हाला एखाद्या अडचणीच्या किंवा गरजेच्या वेळी मदत करते तेव्हा तुम्ही त्यांना धन्यवाद म्हणता. हे सौजन्य आहे, असे केल्याने फायदा असा होतो की, तो लोकांना मदत करण्यास प्रेरित होतो. हवे असल्यास तुमचे आयुष्य बदलणाऱ्या घटना किंवा यशाबद्दल लिहा. ज्याने तुम्हाला या कामात मदत केली आहे, त्याचे पुन्हा आभार माना आणि त्याच्या मदतीबद्दल इतरांनाही सांगा.

५) चांगले काही वाचा, स्वतःच्या आत डोकवा
स्वतःमध्ये असलेला अहिंसेचा विचार सरावाने आणखी दृढ करता येतो. मात्र, त्यासाठी अहिंसेची शक्ती ओळखणे आवश्यक आहे. सर्वात सोपा मार्ग म्हणजे वाचन करणे. सकारात्मक कामांवरील लेख, मासिके आणि पुस्तके वाचा. अहिंसेशी संबंधित विषयावरील व्हिडिओ पाहा. त्याग, दान, क्षमा, अध्यात्म आणि शांतता यांच्याशी संबंधित लोकांच्या जीवनकथा वाचा.

६) तुमच्या नावडत्या व्यक्तीशीही बोला
हिंसा आणि अहिंसा तुमच्या धारणांमधून निर्माण होतात. तुमचे विचार एखाद्याबद्दल नकारात्मक होतात तेव्हा त्याच्याबाबत मानसिक किंवा शारीरिक हिंसा होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला आवडत नसलेल्या किंवा तुमचे मतभेद असलेल्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा दृष्टिकोन विकसित होईल. त्याला समजण्यास मदत होईल. मतभेदांमुळेच जीवनात विविधता येते, हे लक्षात ठेवा.

७) अडथळे लिहून काढा, पर्याय सापडतील
अहिंसा म्हणजे निष्क्रियता नाही... ते कठीण काम आहे... ती संयमातून येते. तुमची कोणतीही योजना पूर्ण होण्यास विलंब होत असल्यास घाबरू नका, कारण भीतीमुळे असुरक्षितता आणि असुरक्षिततेमुळे हिंसा निर्माण होते. अशा परिस्थितीत असे किमान तीन मार्ग ओळखण्याचा प्रयत्न करा, ज्याद्वारे तुम्ही ध्येय साध्य करू शकता. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला नकारात्मक विचारांमध्ये जाण्यापासून रोखू शकता.

८) दोन लोकांमधील संघर्षात मध्यस्थी करा
लोकांमधील आपसातील संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे. दोन लोकांमध्ये संघर्ष किंवा दुरावा सुरू असतो तेव्हा तो सोडवण्यासाठी मी कसा हातभार लावू शकतो याचा विचार करण्याची तुमची भूमिका असावी. तुमच्या सभोवतालच्या वादग्रस्त लोकांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी. आपण त्यांना एका मंचावर, टेबलवर आणू शकतो.

९) कुणाचे सहकार्य घ्या आणि कुणाला साथ द्या
तुम्ही इतरांसोबत एकत्र काम करता तेव्हा मजबूत होता. यामुळे इतरांना समजून घेण्याची आणि त्यांच्यातील चांगुलपणा व उणिवा या दोन्हींचा स्वीकार करण्याची भावना निर्माण होते. त्यामुळे टीम म्हणून काम करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कुटुंबातील किंवा कार्यालयातील, शाळा किंवा समुदायातील टीमवर्क असलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. कुणाची मदत घ्या, कुणाला मदत करा.

१०) आपल्या गोष्टी शेअर करायला व द्यायला शिका
तुमचा वेळ, शक्ती आणि संसाधने गरजवंतांसोबत शेअर करा. तुमचे घर, ऑफिस, गॅरेज यांची साफसफाई करा. या ठिकाणी आता तुमच्या उपयोगाचे नसलेले जे काही मिळेल ते एखाद्या किंवा अनेक गरजवंतांना द्या. कुणाला वस्तूच दिला पाहिजे, असे नाही, तर तुमचे कौशल्य, ज्ञान, माहिती, अनुभव आणि अगदी छोटा उपयुक्त सल्लाही गरजू व्यक्तीचे जीवन बदलू शकतो.