आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या एका न्यायालयाने १२ लोकांना १०६ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश डेन्व्हर शहर आणि काउंटीला दिले आहेत. २०२० मध्ये कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येविरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान पोलिसांनी या लोकांवर जास्त बळाचा वापर केल्याचे न्यायाधीशांनी त्यांच्या निर्णयात म्हटले आहे. कोलोरॅडो जिल्हा न्यायालय हे अमेरिकेतील २०२० मध्ये आंदोलकांवर पोलिसांच्या अतिरेकाच्या आरोपावर दिवाणी खटल्याची सुनावणी करणारे पहिले न्यायालय आहे.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की, यामुळे देशभरातील जॉर्ज फ्लॉइड आंदोलनात पोलिसांच्या गैरवर्तणुकीबाबत प्रलंबित खटल्यांचा आदर्श निर्माण होईल. ८ सदस्यीय ज्युरीने निर्णय दिला की, शहर आणि काउंटी आपल्या पोलिसांना योग्य प्रशिक्षण देण्यात अयशस्वी ठरले आहेत. अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन, कोलोरॅडोचे संचालक मार्क सिल्व्हरस्टीन म्हणतात, हा निर्णय देशभरातील पोलिसांना एक स्पष्ट संदेश आहे.
पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता जवळून त्यांच्यावर रबराच्या गोळ्या झाडल्या आणि लाठीमार केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी आंदोलकांवर मिरपूड स्प्रे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जेक पेकार्ड हा एक आंदोलक डोक्यात रबर बुलेट लागल्याने बेशुद्ध झाला. त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्याला सर्वाधिक २२ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. आणखी एक तक्रारदार डॉ. स्टॅनफोर्ड स्मिथ एका आंदोलकाशी बोलत असताना एका पोलिस अधिकाऱ्याने थेट त्यांच्या चेहऱ्यावर मिरचीचा स्प्रे फवारला. शहर आणि डेन्व्हर काउंटीच्या वकिलांनी आंदोलकांशी पोलिसांच्या वर्तनातील त्रुटी मान्य केल्या. परंतु, आंदोलकांनी सातत्याने हिंसाचार आणि तोडफोड केली, असा युक्तिवाद त्यांनी केला.
अमेरिकेत पोलिसांविरुद्ध अनेक खटले
अमेरिकेत अनेक लोकांनी पोलिसांवर गुन्हे दाखल केले आहेत. काही प्रकरणांत खटले सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. डेन्व्हर सार्वजनिक सुरक्षा विभागानुसार, शहरातील अधिकाऱ्यांनी आंदोलनाशी संबंधित अनेक बाबींवर आधीच तोडगा काढला आहे. जखमींना सुमारे १० कोटी रु.ची भरपाई देण्यात आली. कोलंबस शहरात ३२ लोकांना ४३ कोटी रु. सेटलमेंट म्हणून देण्यात आले. पोलिसांच्या कारवाईत हे लोक जखमी झाले होते.
सोफी कासाकोव
© The New York Times
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.