आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण:2021 मध्ये 36.3 अब्ज टन गॅस उत्सर्जन, इितहासामध्ये सर्वाधिक

हेन्री फाउंटेनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रज्ञांनी सांगितले की, मे महिन्यात वातावरणामध्ये पृथ्वीला उष्ण करणारा कार्बन डायऑक्साइड विक्रमी प्रमाणात सोडण्यात आला आहे. हे माणसाकडून औद्योगिकीकरणापूर्वी सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त आहे. १९ व्या शतकात तेल, गॅस, कोळसा जाळण्यासोबतच उष्ण गॅसेसचे उत्सर्जन सुरू झाले आहे. अमेरिकेच्या नॅशनल ओसेनिक अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या (एनओएए) अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४० लाख वर्षांत पृथ्वीवर इतके जास्त कार्बन डायऑक्साइड यापूर्वी कधीच नव्हते.

जगभरात विद्युत केंद्रे, वाहने, कृषी फार्म आणि इतर स्रोतांतून मोठ्या प्रमाणात वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे (सीओटू) उत्सर्जन केल्याने मेमध्ये गॅसचा संचय प्रति दहा लाखांवर सुमारे ४२१ अंशांपर्यंत पोहोचला. वर्षभरात सध्या सर्वाधिक उत्सर्जन होते. २०२१ मध्ये ३६.३ अब्ज टन गॅसचे उत्सर्जन झाले आहे. हे इतिहासात सर्वाधिक आहे. सरासरी जागतिक तापमान आधीच्या औद्योगिक काळापेक्षा १.१ अंश सेल्सियस जास्त आहे. सीओटूचे वाढते प्रमाण म्हणजे सर्व देशांकडून २०१५ मध्ये पॅरिस येथे तापमान वाढीला १.५ अंश सेल्सियसपर्यंत मर्यादीत ठेवण्याचे उद्दिष्ट दूर असल्याचे संकेत आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या मर्यादेनंतर हवामान बदलाचे विनाशकारी परिणाम वाढतील.

एनओएए ग्लोबल मॉनिटरिंग लॅबमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ पीटर टॅन्स सांगतात, महामारीमुळे हालचाली मंदावल्याने कार्बन डायऑक्साइडची पातळी २०२० मध्ये थोडी घटली होती. मात्र, दीर्घकाळाच्या ट्रेंडवर कोणताच परिणाम झाला नाही. सीओटूची पातळी वर्षभर वेगवेगळी राहते. हिवाळ्यात वनस्पती नष्ट झाल्याने आणि सडल्याने गॅस वाढते. वसंत ऋतू, उन्हाळ्यात वाढणारी झाडे फोटोसिंथेसिस प्रक्रियेच्या माध्यमातून गॅस ग्रहण करतात. यामुळे त्याचे प्रमाण घटते. उत्तर गोलार्धात (आशिया, युरोप, उत्तर अमेरिका) झाडांच्या वाढीमुळे गॅस उत्सर्जन शिखरावर राहते. दक्षिण गोलार्धाच्या (ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्क्टिका) तुलनेत उत्तर गोलार्धात जमीन, वनस्पती अधिक आहे. त्यामुळे उत्सर्जनाचा जास्त परिणाम राहतो.

बातम्या आणखी आहेत...