आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपमध्ये दुष्काळ:स्पेनमधील ऑलिव्ह शेतीला 7500 कोटी रु. नुकसानीची भीती

डेव्हिड सीगल, जोस बाॅटिस्टा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुष्काळामुळे युरोपातील डझनभर पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. रोमानियात मका, इटलीत तांदूळ, बेल्जियममध्ये बीन्स आणि फ्रान्समध्ये गाजर व लसणाचे प्रचंड नुकसान झाले. स्पेनमधील ऑलिव्ह पिकावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. स्पेन जगाच्या निम्म्या ऑलिव्ह ऑइलचे उत्पादन करतो. इंटरनॅशनल ऑलिव्ह कौन्सिलच्या मते, ते इटलीपेक्षा एका वर्षात जास्त ऑलिव्ह ऑइलचे उत्पादन करतात. या भागाला ऑलिव्ह ऑइलची जगाची राजधानी म्हटले जाते. इथे प्रत्येक टेकडी, दरी, रस्ता व महामार्गालगत ऑलिव्हची झाडे दिसतात. त्यांची संख्या सहा कोटी ७० लाख असल्याचे सांगण्यात येते. हे मानवनिर्मित सर्वात मोठे जंगल म्हटले जाते.

जेइन येथील एल मोलार गावातील शेतकरी बाॅटिस्टा यांनी पाच हजार ऑलिव्हची झाडे लावली आहेत. त्यांना आणि इतर शेतकऱ्यांना जेइनमधील ऑलिव्ह पीक गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी होण्याची भीती वाटते. शेतकऱ्यांना ७५०० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते, असा सरकारचा अंदाज आहे. जेइनच्या ऑलिव्ह पिकातून काढलेल्या तेलाच्या डझनभर जाती जगभरात विकल्या जातात. ऑनलाइन खरेदी थेट स्थानिक गिरण्यांमधून केली जाते. अनेक महान स्पॅनिश कवी, गायक आणि चित्रकार या परिसरातून उदयास आले आहेत. ऑलिव्हच्या झाडांनी सोशल मीडियावर स्थान मिळवले आहे. जेइनच्या एका शेतकऱ्याचे टिकटॉकवर १७ लाख फॉलोअर्स आहेत. स्थानिक सरकारच्या पाठिंब्याने ऑलिव्ह ऑइल पर्यटन उद्योगाने जेइनमध्ये पाय रोवले आहेत. ऑलिव्ह ऑइलची मसाज देणारे स्पा आहेत. अनेक दुकाने ऑलिव्ह ऑइलच्या डझनभर जाती विकतात. ऑइल मिल पर्यटकांना अल्कोहोलप्रमाणे ऑलिव्ह ऑइलची चाचणी करायला लावते.

५०० वर्षांचा विक्रम रोमन लोकांनी शेकडो वर्षांपूर्वी स्पेनमध्ये ऑलिव्हची झाडे लावायला सुरुवात केली होती. हजारो शेतकरी आणि मजुरांचा उदरनिर्वाह ऑलिव्हवर अवलंबून आहे. भूमध्यसागरीय हवामानात वाढणाऱ्या या झाडांना फार कमी पाऊस लागतो. मात्र, यंदा किमान पाऊस पडला आहे. युरोपियन दुष्काळ वेधशाळेने म्हटले आहे की, युरोप ५०० वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करत आहे.

बातम्या आणखी आहेत...