आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:मुंबईच्या ताजमहाल हॉटेलकडे 762 कोटींच्या थकीत भाड्याची मागणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील पोर्ट ट्रस्टच्या परिसरातील कंपन्या आणि भाडेकरू सरकारने बजावलेल्या एका नोटीसमुळे त्रस्त झाले आहेत. त्यांना मागील वर्षांतील थकीत भाड्याचे भले मोठे बिल मिळाले आहे. संबंधित जागेचे मालक मुंबई पोर्ट ट्रस्टने ताजमहल हॉटेलकडून २०२१-२२ दरम्यानच्या थकीत भाडेपट्ट्यापोटी ७६२ कोटी रुपयांची मागणी केली आहे. भाडे खूप जास्त आणि अयोग्य आहे, असे म्हणत टाटा ग्रुपच्या या हॉटेलने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अन्य भाडेकरूंचीही अवस्था अशीच आहे. एकेकाळी मुंबईच्या या सर्वात जुन्या व्यापारी जिल्ह्यात अनेक जागतिक कंपन्यांची मुख्यालये होती.

खोल पाण्यातील नैसर्गिक बंदरापासून सध्याची मुंबई अस्तित्वात आली आहे. शिपिंग आणि वेयरहाऊस, रिफायनरी, हाॅटेल यासारख्या पूरक उद्योगांच्या प्रशासकीय सोयीसाठी १८७३ मध्ये पोर्ट ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ट्रस्टने जमीन विकण्याएेवजी २३०० एकर (९४० हेक्टर) जमिनीवरील भूखंड ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिले होते. ताज हॉटेलसह सर्व भाडेपट्ट्यांची मुदत नव्या शतकाच्या सुरुवातीला संपली होती. त्यानंतर ताज आणि अन्य काही भाडेपट्ट्यांना मुदतवाढ देण्यात आली. काही भाडेकरूंनी थकबाकी भरली, काहींनी भरलेली नाही.पोर्ट ट्रस्टचे म्हणणे आहे, की बाजार दराच्या आधारेच भाडेवाढ करण्यात आली आहे. तसे पाहता, गेल्या २० वर्षांत कोणताही नवा भाडेकरार देण्यात आलेला नाही. त्यामुळे ताज आणि अन्य काही इमारती वगळता अनेक सुंदर भवनांची देखभाल-दुरुस्ती करण्यात आलेली नाही. अनिश्चित कायदेशीर स्थितीमुळे भाडेकरू पैसा गुंतवण्यास तयार नाहीत. ते आपली जागा अन्य लोकांना भाड्याने देऊ शकत नाहीत. ताजशी सुरू असलेल्या वादामुळे स्थिती बदलण्याची शक्यता आहे. या दरम्यान, भाडेपट्टा नूतणीकरणाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी पोर्ट ट्रस्ट अधिक लवचिक नियम तयार करत आहे.

१२०० भाडेकरूंनी खटले दाखल केले १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला भाडेकरूंनी भाडेपट्ट्यातील बदलाला न्यायालयात आव्हान देण्यास सुरुवात केली होती. जागा रिकामी करण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या, पण प्रकरण न्यायप्रवीष्ट असल्याने त्यावर कार्यवाही झालेली नाही. ट्रस्टच्या जमिनीवरील जवळपास तीन हजारपैकी १२०० पेक्षा अधिक भाडेकरूंनी खटले दाखल केले आहेत. यासाठी ट्रस्टला २०० पेक्षा अधिक वकिलांची सेवा घ्यावी लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...