आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • 9 Lakh Crore In AI Last Year. Investment Of; Changes In Human Creativity Due To Its New Models | Artical By Divya Marathi

मानवी सर्जनशीलता:एआयमध्ये गेल्या वर्षी 9 लाख कोटी रु. ची गुंतवणूक; याच्या नव्या मॉडेल्समुळे मानवी सर्जनशीलतेत बदल

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगल्या म्हणी वापरून आपली वाक्ये पूर्ण करू शकेल किंवा मधुर गाण्याचे बोल लिहून त्याला चाल लावू शकेल किंवा काॅम्प्युटर कोडच्या शेकडो ओळी तयार करून जटिल समस्येवर उपाय शोधू शकेल, अशा एखाद्या संगणकाची कल्पना करा. हा संगणक नवीन प्रकारच्या यंत्रांचा एक भाग आहे. त्याला भाषा, संगीत आणि प्रोग्रामिंगचे संकेत समजतात. यांचा वापर तो मानवांप्रमाणे सर्जनशील मार्गाने करू शकतो. हे सर्व करणारे फाउंडेशन मॉडेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मधील नवीन शोधात समाविष्ट आहेत. ते नवीन क्रांतीची आशा जागवतात. परंतु, ते उच्च दर्जाच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम करतील. फाउंडेशन मॉडेल्स हे डीप लर्निंग (डीएल) तंत्रज्ञानातील एक टर्निंग पॉइंट आहेत. हे एआयच्या क्षेत्रात वर्चस्व गाजवतात. डीएल प्रणाली मानवी मेंदूतील न्यूरॉन्सच्या नेटवर्कवर आधारित असतात. ते लाखो किंवा अब्जावधी मजकूर, चित्रे किंवा ध्वनी क्लिप वापरून तयार केले जातात. अलीकडच्या वर्षांत डीएल सिस्टिम्सच्या प्रशिक्षणाची वाढती किंमत आणि वेळ यावरून तंत्रज्ञान त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचले असल्याचे वाटते. परंतु, मोठ्या आणि अधिक जटिल डीप लर्निंग सिस्टिम्स तयार करून नवीन कार्यक्षमता प्राप्त करता येईल, हे फाउंडेशन मॉडेल्सने दाखवून दिले आहे. फाउंडेशन मॉडेल्सचे काही आश्चर्यकारक आणि उपयुक्त गुणधर्म आहेत. समोरच्या परिस्थितीला अनुसरून विनोद, म्हणी आणि विशेषणे बनवण्याचे कौशल्य सर्वात विचित्र आहे. अॅलन आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट चालवणाऱ्या ओरेन एत्झोनी यांचा अंदाज आहे की, ८०% पेक्षा अधिक एआय संशोधन फाउंडेशन मॉडेल्सवर केंद्रित आहे. मायक्रोसॉफ्ट, मेटा-फेसबुक, अल्फाबेट-गुगलकडे अशी अनेक मॉडेल्स आहेत. टेस्ला त्यांच्या सेल्फ-ड्रायव्हिंग कारसाठी एक प्रमुख फाउंडेशन मॉडेल तयार करत आहे. या क्षेत्रातही नवीन कंपन्या येत आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेच्या उद्यम भांडवलदारांनी एआय कंपन्यांत ८.९४ लाख कोटी रु. गुंतवणूक केली. चीनने या क्षेत्राचा राष्ट्रीय प्राधान्यक्रमात समावेश केला. फाउंडेशन मॉडेल्सचा उपयोग नव्या औषधांचा शोध, ऊर्जेच्या नव्या स्रोतांची निर्मिती, सर्जनशील लेखन, रेखाचित्र, डिझाइन, संगणक प्रोग्रामिंग, विशाल डेटाबेसवर आधारित प्रश्नांची उत्तरे तयार करण्यासाठी होऊ शकतो. अनेक कंपन्यांना एआयच्या फाउंडेशन मॉडेल्सच्या गैरवापराची भीती वाटते. ही मॉडेल्स जितकी शक्तिशाली असतील तितका त्यांच्यापर्यंत पोहोचणे मर्यादित होत जाईल. यामुळे नवीन वर्गाचा उदय होईल. वर्षानुवर्षे म्हटले जात आहे की, एआय-आधारित ऑटोमेशनमुळे सामान्य आणि समान काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येईल. कलाकार, लेखक, प्रोग्रामर सुरक्षित राहतील. फाउंडेशन मॉडेल या गृहितकांना आव्हान देतात. उत्पादकता वाढवण्यासाठी एआयचा वापर करणे कसे शक्य आहे हे ते सांगतात. मशीन इंटेलिजन्सचा योग्य वापर केल्यास मानवांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. एआय आधारित फाउंडेशन मॉडेल्स वेगाने सुधारत आहेत. हे मॉडेल रेडिमेड डेटाची मदत घेण्याऐवजी स्वयं-शिक्षण तंत्रज्ञानावर काम करतात. मजकुराचा ढीग पाहत मग लपलेला शब्द काय असावा याचा अंदाज घेत असताना ते काही शब्द स्वतःपासून लपवतात.

काही लोक अधिक शक्तिशाली होण्याचा धोका एआयच्या नव्या शोधांमुळे चिंताही वाढली आहे. तज्ज्ञांना भीती वाटते की, कृत्रिम बुद्धिमत्ता इतकी सर्जनशील आहे की ती मानवांसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. या मॉडेल्सच्या प्रशिक्षणासाठी खर्च होणारी वीज आणि कार्बन उत्सर्जन याबद्दल लोक चिंतित आहेत. फाउंडेशन मॉडेल्सवरील नियंत्रणाचा प्रश्न लोकांना सतावतो. गुगलच्या पीएएलएमसारख्या मोठ्या सिस्टिमच्या प्रशिक्षणासाठी एका वेळी ७७ कोटी रुपये खर्च येतो. यासाठी भरपूर डेटा आवश्यक आहे. अधिक संगणन शक्ती आणि अधिक डेटा उत्तम मॉडेल्सकडे नेईल. यामुळे काही तंत्रज्ञान कंपन्यांच्या किंवा सरकारांच्या हातात तंत्रज्ञान केंद्रित होण्याचा धोका निर्माण होईल. डेटा आणि माहितीच्या संग्रहातून रंग, वंश, जातीच्या आधारावर भेदभाव आणि अन्यायाचा धोका कायम राहील.

बातम्या आणखी आहेत...