आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या आठवड्यात सॅम बँकमन-फ्राइड हे क्रिप्टो उद्योगातील व्यक्तिमत्त्व सर्वाधिक चर्चेत होते. ते एफटीएक्सचे संस्थापक आहेत, ते एकेकाळी उद्योगातील तिसरे मोठे एक्सचेंज होते. ३० वर्षीय माजी अब्जाधीशांनी या वर्षाच्या सुरुवातीला क्रिप्टोच्या किमती कमी होत असताना व्हॉयजर आणि ब्लॉकफाय कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिले. त्यांनी क्रिप्टो हेज फंड थ्री एरोजची मालमत्ता खरेदी केली. त्यांच्या शिखरावर बँक्समन-फ्राइडची मालमत्ता दोन लाख कोटी रुपयांहून अधिक होती. त्यांनी क्रिप्टोचे नियमन आणि ओळख यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. अनेकांना वाटले की, एसबीएफ उद्योगाला वाचवू शकतात. पण, ताकदवान लोकही खाली पडतात. एफटीएक्समध्ये निधी नसल्याच्या अफवा पसरल्यानंतर ७ नोव्हेंबरला लोकांनी एक्सचेंजमधून सुमारे ७ हजार कोटी रुपये काढून घेतले. यानंतर एक्सचेंजने पैसे देणे बंद केले. एफटीएक्सच्या टोकनचे मूल्य ४ नोव्हेंबरपासून ९०% कमी झाले आहे. ८ नोव्हेंबरला बायनान्स या सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजचे प्रमुख चांगपेंग झाओ यांनी एफटीएक्स खरेदी करण्याच्या हेतूच्या पत्रावर स्वाक्षरी करण्याची घोषणा केली. एफटीएक्सचा हिशेब पाहिल्यानंतर बायनान्स दुसऱ्या दिवशी मागे हटले.
याचा उद्योगाच्या इतर भागांवरही परिणाम झाला आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत बिटकॉइन १९% खाली होते. त्याची किंमत १६,६०० डाॅलर होती. जेपी मॉर्गन चेस इन्व्हेस्टमेंट बँकेने इशारा दिला की, क्रिप्टो मार्केटवर मोठा परिणाम होऊ शकतो. कंपन्या अपयशी होऊ शकतात. हा गोंधळ टाळण्यासाठी मजबूत संस्थांची संख्या कमी होत आहे. क्रिप्टो उद्योगाच्या प्रतिष्ठेला बरेच नुकसान होऊ शकते. ९ नोव्हेंबरला अमेरिकन सिक्युरिटीज एक्स्चेंज कमिशन आणि न्याय विभागाने एफटीएक्सची चौकशी सुरू केल्याची बातमी आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.