आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पीक-अप:काँग्रेस आणि टीएमसीच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधकांना भाजपच्या विजयरथाला कोणत्याही प्रकारे आव्हान द्यायचे असेल तर २०२४ मध्ये काँग्रेस आणि टीएमसीला मध्यवर्ती भूमिका बजावावी लागेल. हे दोन्ही पक्षच विरोधी पक्षातून सर्वाधिक जागा जिंकण्याची शक्यता आहे. पण, भाजपविरोधी आघाडीच्या समर्थनार्थ ममता नवी दिल्लीत आल्या, तेव्हा राहुल गांधींनी त्यांची भेट घेतली नाही. परंतु, राहुल यांच्या प्रतिकूल वृत्तीने संभाव्य काँग्रेस-तृणमूल युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. इकडे ममता आपले माजी मंत्री पार्थ चटर्जी यांच्या भ्रष्टाचारापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ममताच्या संमतीशिवाय एखादे पानही हलत लागत नाही हे बंगालमधील सर्वांनाच माहीत आहे. या घोटाळ्यामुळे ममता यांनी निर्माण केलेल्या साध्या प्रतिमेला तडा गेला आहे. त्या पांढरी सुती साडी नेसतात, एका छोट्या घरात राहतात आणि त्यांची जीवनशैली साधी आहे. पण, ईडीला चटर्जीची जवळची सहकारी अर्पिताच्या घरात सापडलेली संपत्ती पक्ष-निधी आहे, तो ‘सुरक्षित’ ठिकाणी ठेवला होता.

२०११ मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून ममता यांच्यावर राजकीय हिंसाचार भडकवल्याचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप आहे. शारदा घोटाळ्याची चौकशी अजूनही सुरू आहे. तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते त्याच्या घेऱ्यात आहेत. पण, पार्थ चटर्जी आणि अर्पिता यांचा समावेश असलेला एसएससी घोटाळा २०१६ मध्ये ममतांनी चॅटर्जी यांना शिक्षण मंत्री केले तेव्हा सुरू झाला होता. या घोटाळ्यामुळे ममतांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेवर परिणाम होऊ शकतो. ममता यापूर्वी केलेले आरोप बाजूला सारत आल्या आहेत. टीएमसी केडरकडून भाजप कार्यकर्त्यांबाबत झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणापासूनही त्यांनी स्वतःला दूर केल होतेे. बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारानंतर भाजपच्या हायकमांडनेही आपल्या कार्यकर्त्यांच्या हत्येबाबत ढिलाई दाखवली, तेव्हा ममतांचे मनोबल वाढले. खरे तर १९७७ मध्ये डावे पक्ष सत्तेवर आल्यापासून बंगाल राजकीय हिंसाचाराचे केंद्र बनले आहे. डाव्यांच्या ३४ वर्षांच्या राजवटीत राजकीय विरोधकांच्या टार्गेट किलिंगच्या घटना सामान्य होत्या. पण, तृणमूलने रक्तपाताची ही संस्कृती वेगळ्या पातळीवर नेली आहे. २०२१ च्या विजयानंतर ममतांच्या मनात राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आली होती, पण आता त्यांची प्रतिमा डागाळली आहे. २०२४ मध्ये बंगालमधून ३५ जागा जिंकण्याच्या त्यांच्या आशा आता थंडावू लागल्या आहेत.

मोदी व शहा चोवीस तास राजकारणी आहेत, तर राहुल पार्ट टायमर असल्याचे दिसते. ते अधूनमधून संसदेत हजेरी लावतात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पक्षापासून दूर जात आहेत. काँग्रेसची सत्ता दोनच राज्यांत राहिली आहे. पंजाब, कर्नाटक व आता महाराष्ट्रही हातातून गेले. २०२४ मध्ये काँग्रेसला ५० जागा जिंकणे कठीण जाईल, हे राहुल यांना माहीत आहे. २०१९ मध्येदेखील त्यांनी जिंकलेल्या ५२ जागांपैकी १५ एकट्या केरळमधील होत्या. काँग्रेसने प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक लढवली होती. दणदणीत पराभवामुळे त्यांचाही उत्साह थंडावला आहे. प्रियंका यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मतटक्का ६.२५ वरून २.३३ वर आला होता. खरे तर आज भारतीय राजकारणात तीन केंद्रे आहेत. एका बाजूला जवळपास अजिंक्य भाजप आहे. दुसरीकडे केसीआर, जगन रेड्डी, एमके स्टॅलिन व नवीन पटनायक यांसारखे प्रादेशिक सरदार आहेत, त्यांची निष्ठा त्यांच्या जहागिरीशिवाय कोणाशीही नाही. काँग्रेस हा तिसरा अक्ष आहे, पण यूपीए आता तुटत चालली आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली यूपीए, तृणमूल व प्रादेशिक नेत्यांना सोबत घेऊन युती होईल, अशी रणनीती विरोधकांनी आखली होती, पण आता महाराष्ट्राच्या दुर्घटनेनंतर हे अवसानही गळाले. यातून देशभर एकच संदेश गेला, विजोड युती एका राज्यात सत्ता वाचवू शकली नाही, ती देशात एकसंघ कशी राहणार? (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

मिन्हाज मर्चंट लेखक, प्रकाशक आणि संपादक mmleditorial@gmail.com

बातम्या आणखी आहेत...