आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया शुक्रवारच्या रात्री मी एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट््स थिएटर) मध्ये बसलो होतो. तेथे एका संगीत नाटकाचे सादरीकरण सुरू होते. त्यातील ५८ व्या मिनिटाला पिवळा सफारी सूट परिधान करून हीरो समोर येतो आणि आपल्या जीवनाची कथा सांगतो. मला असे वाटले की मी हा आवाज कुठे तरी ऐकला आहे. हीरोला गुलजारसाहेबांनी आवाज दिला होता. त्यांच्या बोलण्याची पद्धत, अंतर आणि उच्चार अत्यंत चपखल होते. महान शायरच्या आवाजामुळे मी त्या कथेच्या आत जाऊ शकलो. हीरो आपल्याला त्याच्या बालपणात घेऊन जातो. तो १९३० च्या दशकात एका छोट्याशा गावात राहायचा. आई-वडिलांसह चार भाऊ आणि एक बहीण असा त्यांचा परिवार. तशीच खेळणी घेऊ शकत होता. वडील होडी चालवायचे. नाटकात मुलाने मच्छीमारांप्रमाणे पांढरे धोतर आणि शर्ट परिधान केलेला होता.
गरिबी आणि अनिश्चितता असतानाही त्या कुटुंबाच्या इच्छा-आकांक्षा होत्या. आपल्या कुटुंबाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढू किंवा आपली मुले जीवनात यशस्वी होतील असा विश्वास वडिलांना होता. वडिलांच्या या विश्वासामुळे चौथा मुलगा प्रभावीत होता. आपल्या गावापासून दूर शिक्षणासाठी जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तो करतो. अन्य लोकांप्रमाणे तोही अनेक समस्यांचा सामना करतो. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये त्याची निवड होते, मात्र प्रवेश शुल्क भरण्यासाठी त्यांच्याजवळ एक हजार रुपये नव्हते. त्याच्या बहिणीने दागिने गहाण ठेवून ही रक्कम उपलब्ध केली. त्याने कसून अभ्यास केला आणि १९५४ मध्ये एअरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.
तांत्रिक विकास व उत्पादन संचालनालय आणि भारतीय वायुसेनेत त्याला संधी दिसल्या. कागदाची विमाने उडवणारा मुलगा आता खरेखुरे विमान उडवू इच्छित होता, मात्र त्याची निवड झाली नाही. चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यानंतर तो ऋषीकेशच्या स्वामी शिवानंद आश्रमात निराश होऊन बसला होता. स्वामीजींनी त्याला बोलावले आणि भगवद्गीतेतील ११ वा अध्याय ऐकवला. त्यानंतर त्याचे आयुष्य बदलले. संपूर्ण नाटकात हीरोचे जीवन तीन वेगळ्या टप्प्यांत दाखवण्यात आले होते. त्यांचे कपडे कधीही रंगीबेरंगी नव्हते, मात्र नाटक संपल्यानंतर तिरंग्याचे सर्व रंग फडकताना दिसत होते. तुम्ही विचार करत असाल की हे हीरो कोण आहेत? कदाचित आतापर्यंत तुम्ही अंदाज बांधला असणार. ते असे दूरदृष्टे होते, ज्यांना वाटायचे की आपल्या सर्वांच्या आत दिव्य अग्नि असतो. ते एक उत्कृष्ट वैज्ञानिक होते, विद्वान आणि तत्त्ववेत्ते होते, लेखक होते आणि पुढे चालून ते देशाचे राष्ट्रपतीही बनले.
भोपाळ येथील संस्कार व्हॅली स्कूलमधील ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी गीत, नृत्य आणि त्या सर्व घटनांचे अद्भूत नाट्य रूपांतर सादर केले, ज्या घटनांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना प्रभावित केले आणि त्यांच्या जीवनात ते महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. मी एनसीपीएच्या बाहेर आलो तेव्हा अमिताभ बच्चन यांनी आपल्या वडिलांची एक ओळ ट्विट केली होती. जीवन का मेला जितना भड़कीला रंग-रंगीला होता है, मानस के अंदर उतनी ही कमजोरी होती है। मी हसलो आणि लाइकचे बटन दाबून घरी गेलो.
एन. रघुरामन
मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.