आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेस्टसेलरची शिकवण - ब्रेनी ब्राउन:मोठे होण्याची कला शिकवणारे पुस्तक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनचे संशोधन प्राध्यापक ब्रेनी ब्राउन यांनी आतापर्यंत ६ बेस्टसेलर पुस्तकांचे लेखन केले आहेत. डेअर टू लीड या पुस्तकात त्यांनी नेतृत्व कौशल्यांमध्ये अपेक्षित धैर्य, निर्णयक्षमता आणि सकारात्मकता याविषयी लिहिले. या पुस्तकाचा हा सारांश.

नेते शिकणे जाणतात एक शब्द आहे लर्नर्स आणि आणखी एक शब्द नोअर्स. शिकणाऱ्यांना नेहमी काही शिकायचे असते, तर नोअर्सना वाटते की, त्यांना सर्वकाही माहीत आहे. नेत्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी शिकण्याच्या स्थितीत असतात. ते नोअर्स मोडमध्ये गेले तर त्यांना लुजर म्हटले जाईल. विकासाची मानसिकता ही नेत्यांना इतरांपासून वेगळे करते. सामान्यतः असे मानले जाते की, नेते परिपूर्ण असतात आणि त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते. असे असूनही नवीन काही शिकण्याची संधी त्यांना कधीच सोडायची नसते.

एम्पथीची कला सिम्पथी व एम्पथी यात छोटासा फरक आहे. सिम्पथी म्हणजे एखाद्याच्या अनुभवांशी स्वतःला जोडणे व एम्पथी म्हणजे स्वतःला कुणाच्या भावनांत गुंतवणे. सिम्पथीत आपण कोणासाठी तरी अनुभवतो, तर एम्पथीत कोणाच्या सोबत असतो. सतर्क व समजदार असल्याशिवाय हे शक्य नाही. नाॅन-जजमेंटल असावे. सहानुभूतीचा गुण असलेलाच खरा नेता असतो. ‘तुम्हाला काय वाटत आहे हे मी समजू शकतो’ असे म्हणण्याची त्यांच्यात समज असते.

स्वतःबद्दल दयाळूपणा सेल्फ-कम्पॅशन ही एक नवीन कल्पना आहे. यामध्ये आपण एखाद्या प्रिय व्यक्तीशी जसे बोलतो तसे स्वतःशी बोलतो. यात आपण दयाळू दृष्टिकोनातून गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि फार कठोर होत नाही. नेत्यांना स्वत:ची काळजी आणि उपचार करण्याची कला माहीत असते. ते हे शिकले नाहीत, तर त्यांना आव्हानात्मक जीवनशैलीशी जुळवून घेणे कठीण होईल. नेत्यांनी स्वत:बद्दल नम्र असणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच टीमसाठी सहानुभूतीपूर्ण असणे महत्त्वाचे आहे.

कथा सांगण्याचे कौशल्य आपण सगळे नेहमीच आपापल्या कथा सांगत राहतो. या कथा जीवनाबद्दल, इतरांबद्दल किंवा आपल्याबद्दलच्या असतात. परंतु, नेते स्वतःला इतरांपेक्षा अधिक सांगत असलेल्या कथा मानतात आणि आपले मूल्य नेहमी काळजीपूर्वक शोधतात. याला एसएफडी किंवा स्टाॅर्मी फर्स्ट ड्राफ्ट असेदेखील म्हणतात. स्वतःला सांगितल्या जाणाऱ्या कथा काहीशा गोंधळलेल्या आणि कच्च्या मसुद्यासारख्या असतात, परंतु त्यामध्ये एक क्रम शोधणे नेत्यांचे काम आहे.

जबाबदारी घेण्याचे धाडस लाज आणि अपराधीपणातील फरक दोष आणि जबाबदारी यातील फरकासारखा असतो. लाज म्हणजे स्वतःला अनावश्यकपणे जबाबदार धरणे, तर अपराधीपणाचा अर्थ स्वतःची चूक मान्य करणे. त्याचप्रमाणे ब्लेम म्हणजे दोष देणे आणि जबाबदारी टाळणे, तर अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी घेण्याचे धाडस. जबाबदारी झटकून कोणीही मोठा नेता होऊ शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...