आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • A Cobweb Of Worry Is Ruminating... That Is, Don't Dwell On The Problem That Won't Be Solved

धोका:चिंतेचे कोळ्याचे जाळे हे रूमीनेटिंग... म्हणजे, जी समस्या सुटत नाही तिचा विचार करू नका

समस्या2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोक परस्परातील बोलणे मनावर घेतात. त्यांना त्या वेळी उत्तर द्यावयाचे असते, परंतु देऊ शकत नाहीत. यानंतर सायंकाळी अनेक तास घरी त्या बोलण्यावर द्यावयाच्या प्रतिक्रियेवर आणि आपण कुठे चुकलो याचा विचार करत राहतात.लाख प्रयत्न केल्यानंतरही हे विचार चक्र न रोखल्या जाण्याच्या प्रवृत्तीस चिंतेचे कोळ्याचे जाळे म्हणजे, रूमीनेटिंग म्हटले जाते.तुमच्या चिंतेचे जाळे दैनंदिन जबाबदाऱ्यांवर परिणाम करू लागल्यास तुम्ही त्याला बळी पडलेले असता. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार,अमेरिकेतील डॉ. ट्रेसी मार्क्स मानतात की, ही कोणती वाईट मानसिक स्थिती नाही तर त्यापेक्षाही मोठी समस्या आहे. चिंतेची आपली क्षमता असते. मेंदूचा ब्रेक नियंत्रणाबाहेर झाल्यास हा रेड अलर्ट आहे.

याचा पॅटर्न सामान्य विचारांना यापेक्षा वेगळा करताे. काही गोष्टी लक्षात घेऊन त्या व्यवस्थित केल्या जाऊ शकतात. चिंतेचे आणखी एक लक्षण आहे. तुम्ही अशा गोष्टींचा विचार करता ज्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत. उदा. एखादी भूतकाळातील घटना. तुमची कितीही इच्छा असली तरी ती बदलता येत नाही. तुम्ही या जाळ्यात अडकत जाता. तज्ज्ञांनुसार, काही गोष्टींचा स्वीकार करून त्यातून बाहेर पडू शकता. जाळे तोडण्यासाठी सर्वात आधी लक्ष अन्यत्र वळवण्याचा प्रयत्न करा. गाणे ऐकताना त्यातील ओळीवर किंवा संगीतावर लक्ष द्या. यातून विचारचक्र तुटेल.

विचाराचा ताण येत नाही तोवर ते वाईट नाहीत ताण येत नाही तोवर विचार वाईट होत नाहीत. स्थिती वाईट झाल्यावर हे अन्य प्रकारचे मानसिक आजार निर्माण करू शकते. त्यामुळे ओव्हरथिंकिंग नियंत्रणात नसेल तर उपचार अवश्य घ्या. भूतकाळ विसरून वर्तमानाचा विचार करा.

बातम्या आणखी आहेत...