आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातु म्ही पाहिले असेल की ब्रेड, चिप्स, स्नॅक्स, भुजिया किंवा अशा इतर प्रोसेस्ड् फूडचा रंग तपकिरी, पिवळा किंवा फिकट असतो. परंतु, नैसर्गिक खाद्यपदार्थ बऱ्याचदा वेगवेगळ्या चमकदार रंगाचे असतात. आहार आणि पोषणतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भाज्या आणि फळांचे विविध रंग हे त्यांच्यातील पोषक घटकांचे प्रतीक असतात, ते त्यांची माहिती देत असतात. त्यामुळे रोजच्या आहारात विविध रंगांच्या फळे आणि भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला, तर अधिकाधिक पोषक घटक मिळू शकतात.
लाल फळे आणि भाज्या हृदयासाठी उपयुक्त अभ्यासातून असे दिसून आले आहे की, टरबूज, टोमॅटो, रासबेरी, गुलाबी पेरू, लाल भोपळा, मिरची, डाळिंब, लाल पालक इत्यादींंमध्ये लायकोपिन आणि अँथोसायनिन असते. त्याचप्रमाणे त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात. त्यांचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. टोमॅटोचे नियमित सेवन केल्याने वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी होते.
पिवळा किंवा केशरी रंग हे डोळ्यांचे मित्र पिवळ्या, केशरी रंगाची फळे आणि भाज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. संत्री, गाजर, आंबा, जर्दाळू, हळद, रताळे, लिंबूवर्गीय फळे, अननस यांमध्ये बीटा कॅरोटिन मुबलक प्रमाणात असते, जे आपल्या शरीराद्वारे ‘व्हिटॅमिन-ए’मध्ये रूपांतरित होते. या जीवनसत्त्वामुळे त्वचा, दात, हाडांचे आरोग्य चांगले राहते व दृष्टीही सुधारते. ब्रिटिश जर्नल ऑफ ऑप्थाल्मोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, पिवळ्या रंगाची फळे खाल्ल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
पांढरी फळे-भाज्या घटवतात स्ट्रोकचा धोका सफरचंद, केळी, नाशपाती, फुलकोबी, बटाटे यांसारख्या पांढरी फळे आणि भाज्यांंमध्ये अँटिऑक्सिडंट, भरपूर फ्लेव्होनॉइड्स असतात. या फळे आणि भाज्यांमध्ये विद्राव्य तंतूही मुबलक प्रमाणात आढळतात. ते कोलेस्टेरॉलची वाढ होऊ देत नाहीत आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात. या वर्गात लसूण, मुळा, कांदा आणि मुळा इत्यादींचाही समावेश आहे.
जांभळी फळे-भाज्यांतून प्रतिकारशक्तीत वाढ अमेरिकेत झालेल्या अभ्यासानुसार, जांभळी द्राक्षे, कोबी, बीटरूट, मनुका, काळे गाजर, वांगी इत्यादी आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. “द जर्नल ऑफ फार्माकोलॉजिकल सायन्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या भारतीय शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, जांभळामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत, तर वांग्यामध्ये अँटी-कार्सिनोजेनिक क्लोरोजेनिक अॅसिड आहे, जे फ्री रॅडिकल्सशी लढते. होतो.
हिरव्या रंगामुळे यकृत राहील निरोगी यकृत निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात हिरवी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. ब्रोकोली, केळी, पत्ताकोबी, पालक, अॅव्होकॅडो, शतावरी, कोथिंबीर, मोहरी, किवी, हिरवे सफरचंद आदींमध्ये ग्लुकोसिनोलेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे यकृताद्वारे डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेस मदत करतात. अशा भाज्या नियमित खाव्यात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.