आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • A Comprehensive Approach Is Needed In Promising Statistics | Agralekh Of Divya Marathi

अग्रलेख:आशादायक आकडेवारीत व्यापक दृष्टिकोन गरजेचा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅगच्या अहवालानुसार, २०२२-२३ या वर्षासाठी केंद्र सरकारच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष महसुलात गेल्या सात महिन्यांत अभूतपूर्व वाढ झाली आहे. केंद्रीय महसूल सचिवांच्या म्हणण्यानुसार, अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा सुमारे चार लाख कोटी रु. अधिक महसूल अपेक्षित आहे. आतापर्यंत अंदाजे २% ऐवजी १८% ची वाढ झाली आहे. साहजिकच जीएसटी जास्त जमा झाला तर राज्यांनाही जास्त रक्कम मिळेल. दुसरीकडे रब्बी हंगामात लागवडीखालील क्षेत्रही वाढले असून, पिकाचे चांगले उत्पादन होईल, असे अर्थतज्ज्ञ म्हणत आहेत. प्राप्तिकरातील वाढ हेही सूचित करते की, उच्च मध्यमवर्गीयांचे - विशेषतः पगारदारांचे - उत्पन्न वाढले आहे. सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारून सरकारला गरिबांना मोफत किंवा स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्यासारख्या कल्याणकारी योजना सुरू ठेवाव्या लागतील, परंतु पुन्हा एकदा शिक्षण आणि आरोग्यासाठी अशा योजना आणाव्या लागतील, ज्यामुळे भविष्यात सुधारणा होऊ शकेल. उच्च फायबरयुक्त भरड तृणधान्यांचे फायदे शहरी ग्राहकांना चांगलेच ठाऊक आहेत आणि आजकाल ही तृणधान्ये उच्च मध्यमवर्गाची नवीन निवड बनली आहेत. त्यांचे भावही गहू आणि तांदळाच्या तुलनेत जास्त आहेत. बाजरी, नाचणी, बार्ली, मका या भरडधान्यांचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना हे वाढलेले भाव मिळणे आज गरजेचे आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार युनोने २०२३ हे वर्ष बाजरी वर्ष म्हणून जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...