आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोजची धावपळ आणि जबाबदाऱ्या यामुळे मनात अनेक गोंधळ निर्माण होतात. त्यापासून सुटका हवी असेल तर रोज थोडा वेळ डायरी लिहायला घ्या. डायरी लिहून काय साध्य होईल, हेदेखील जाणून घ्या.
मन हलके होईल... डायरीत लिहिल्यानंतर आपल्याला हलके वाटते. जसजसे लिहीत जाल तसे मनातील चिंता, निराशा, दु:ख स्थिर आणि शांत होते. मनात नवीन कल्पना येण्यास मदत होते.
ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त जेव्हा एखादे ध्येय लिहून ठेवले जाते तेव्हा मेंदू ती महत्त्वाची माहिती म्हणून लक्षात ठेवतो, जितके तुम्ही ध्येयाबद्दल लिहिता तितके तुम्ही ते साध्य करण्याचा प्रयत्न करता. आणि ध्येयापर्यंत पोहोचता.
भावनिक समज वाढवते तुमचे विचार आणि भावना लिहून, तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घेता. हे तुम्हाला तुमच्या नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही बाजू जाणून घेण्यास मदत करते.
तणाव कमी होतो व्यग्र जीवनात तणाव सामान्य आहे. एका अभ्यासानुसार, जर तुम्ही दिवसातून १५-२० मिनिटे स्वअभिव्यक्त लेखन केले तर ते रक्तदाब कमी करण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते.
नियमित कामाच्या सवयी डायरी लिहिल्याने पद्धतशीर काम करण्याची सवय लागते, जो यशाचा मूळ मंत्र आहे. त्यामुळे रोजची कामे त्यात लिहिण्याचा प्रयत्न करा.
सर्जनशीलता फुलते काही लोक सर्जनशील लेखन लिहिण्यासाठी डायरी वापरतात जसे- कविता, कथा, गाणे इ. अशा विचारांवर लक्ष केंद्रित केल्यावर मेंदू आणखी बरेच नवीन विचार निर्माण करतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.