आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • A Leader Who Defames America Will No Longer Be Accepted | Article By Thomas L Freedman

दृष्टिकोन:अमेरिकेला बदनाम करणारा नेता आता मान्य होणार नाही

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या मतदानाच्या वेळी मी थोडा भावूक झालो होतो. आधी तर मी मतदान करण्यासाठी चुकीच्या शाळेत गेलो. तेथील मतदान कर्मचाऱ्याने माझे नाव शोधून काढले आणि मला सांगितले की, माझी नोंदणी जवळच्या बेथेस्डा प्राथमिक शाळेत आहे. मी तिथे गेलो तेव्हा माझ्या घराजवळ राहणारे अनेक स्वयंसेवक होते. त्यामध्ये २० वर्षांच्या तरुणांपासून ते वृद्धांपर्यंतचा समावेश होता. त्यांनी मला मतपत्रिकेद्वारे मतदान कसे करायचे ते सांगितले. माझा फोन वाजल्यावर त्यांनी मला जवळजवळ हलवून सांगितले, ‘तो बंद करा!’ ही खरी आणि चांगली अमेरिका आहे. ही प्रक्रिया अत्यंत प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने पूर्ण केली जात होती. अशा प्रकारे मतदान करू शकणे हे सौभाग्य होते. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी गेली दोन वर्षे हेच लोक आणि याच प्रक्रियेला बदनाम करण्यात घालवली, हे किती विचित्र आहे! २०२० च्या निवडणुकांमध्ये हेराफेरी झाल्याचा खोटा दावा करणाऱ्या या कवायतीत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बहुतांश लोकांनाही सहभागी करून घेतले आहे. पण, गेल्या आठवड्यात ट्रम्प कुठे होते? या मध्यावधी निवडणुकांमध्ये हेराफेरी झाल्याचा आणि त्यांचे निवडलेले उमेदवार या हेराफेरीमुळे जिंकले नाहीत, असा आरोप त्यांच्याकडून किंवा त्यांच्या अनुयायांकडून ऐकला आहे का? ट्रम्प यांनी सर्वत्र फक्त एक निराधार दावा केला की, त्यांचे अॅरिझोनाच्या गव्हर्नरपदाचे उमेदवार कॅरी लेक यांची फसवणूक झाली आहे. त्याऐवजी ट्रम्प यांनी आपली बहुतांश ऊर्जा त्यांच्या काही विजयी उमेदवारांना बदनाम करण्यात खर्च केली. आज ट्रम्प निवडणुकीतील फसवणूक सिद्ध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाच्या वतीने खटला दाखल करत नाहीत ही मोठी गोष्ट आहे. पण, हे उघड खोटे पसरवून डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रसारमाध्यमातील अनुयायी व समर्थकांनी आपल्या लोकशाहीची प्रतिष्ठा, संस्थांबद्दलचा आदर व आपल्या समाजाच्या एकतेची हानी केली आहे, हे आपण कधीही विसरू नये. तो एक लाजिरवाणा विनोद होता, परंतु एका अत्यंत तणावपूर्ण महामारीच्या काळात असे करणे हा गुन्हा होता, तेव्हा आपल्याला एकमेकांवर विश्वास ठेवण्याची, एकमेकांची काळजी घेण्याची आणि कोविड रोखण्यासाठी आपल्या सरकारसोबत काम करण्याची आवश्यकता होती. मला वाटते, याने आपल्या सामाजिक जडणघडणीचे आणि राजकीय व्यवस्थेचे काय नुकसान झाले आहे हे आपण पूर्णपणे समजून घेतलेले नाही. यामुळे थँक्सगिव्हिंग पार्ट्यांमध्ये आमची कुटुंबे वेगळी झाली. त्याने जुनी मैत्री तोडली. याने काॅलनी, नगर परिषद, पीटीए, बोर्डरूम ते राज्य विधानमंडळापर्यंत लोकांची विभागणी केली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने राष्ट्रनिर्मितीच्या कार्यापासून देशाचे लक्ष विचलित केले, त्यामुळे काही तरी मोठे आणि अधिक कठीण करण्यासाठी एकत्र येणे जवळजवळ अशक्य झाले. याने केवळ लोकशाही म्हणून आमची प्रतिष्ठाच कलंकित केली नाही, तर संपूर्ण निवडणूक उलथवून टाकण्याच्या उद्देशाने ६ जानेवारीला संपूर्ण जमावाला कॅपिटाॅल बिल्डिंगवर हल्ल्याला चिथावणी दिली. यामुळे रशियाचे व्लादिमीर पुतीन आणि चीनचे शी जिनपिंगसारखे निरंकुश आणि हंगेरीच्या व्हिक्टर ऑर्बनसारख्या बनावट लोकशाहीवाद्यांना, लोकशाही आणि मतदानामुळे उद्भवणाऱ्या अशा ‘अराजकाची’ आपल्या लोकांना कधीही चिंता करण्याची गरज नाही, अशी बढाई मारण्याची संधी मिळाली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे माजी सल्लागार डेव्हिड एक्सेलरॉड एका मीडिया हाऊसशी बोलले की, काही रिपब्लिकन नेते आता ट्रम्प यांची साथ सोडत आहेत, त्यामुळे ट्रम्प यांचा पराभव होत आहे. म्हणूनच अमेरिकेच्या राजकीय व्यवस्थेबद्दल मला दीर्घ काळानंतर प्रथमच आशा दिसत आहे. २०१५ मध्ये ट्रम्प जिंकले तेव्हापासून रिपब्लिकन पक्षाला छापा आणि काटा आपलाच असावा, असे आले आहे. त्याला ट्रम्प यांच्या जनाधाराची मतेही हवी होती आणि ते त्यांच्या लज्जास्पद वागणुकीकडे डोळेझाक करत असत. आमच्या निवडणूक व्यवस्थेची बदनामी करूनही पक्ष काहीही बोलला नाही. त्यांना ट्रम्प यांच्या जनाधारातून मिळणाऱ्या मतांची सवय लागली होती. पण, आता बहुतांश अमेरिकन लोकांनी आपले मत बनवले आहे. मतदान थांबवण्याचे आणि निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याचे आश्वासन देणाऱ्या पक्षकारांना मतदारांनी पूर्णपणे नाकारले. (‘द न्यूयाॅर्क टाइम्स’मधून.) थॉमस एल. फ्रीडमन तीन वेळचे पुलित्झर अवॉर्ड विजेते व ‘द न्यूयॉर्क टाइम्स’चे स्तंभलेखक

बातम्या आणखी आहेत...