आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:सिंहाला राजमुकुट घातला जात नाही!

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने। विक्रमार्जित सिंहस्य स्वयमेव मृगेन्द्रता!’ म्हणजेच जंगलात सिंहाला कोणीही मुकुट घालत नाही, तो स्वतः आपल्या बळावर राजा होतो. आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी कोणाची वाट पाहू नये, आपल्या क्षमता आणि हुशारीच्या जोरावरच जीवनात पुढे जावे, असा संदेश या सुभाषितातून मिळतो. यामुळे मला वर्ल्डकपमधील अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया सामन्याची आठवण झाली. स्पर्धेतील फेव्हरेट संघ नसलेल्या सौदी अरेबियाने मेस्सीच्या विजयाच्या वाटचालीच्या आशा पल्लवित केल्या. त्याने फुटबॉल इतिहासातील सर्वात नाट्यमय उलथापालथ घडवून आणली.

मला वरील सुभाषित यासाठीही आठवले, कारण मला ‘लायन’ (लिओ मेस्सी) साठी वाईट वाटले. तो आपला पाचवा आणि बहुधा शेवटचा विश्वचषक खेळत आहे, पण खेळादरम्यान तो अनेक वेळा मान खाली घातलेला दिसला! यामुळे मला त्याच्या पूर्ववर्ती डिएगो मॅराडोनाची आठवण झाली, त्याला लहानपणी असे वाटायचे की, प्रत्येक गोल वस्तू बाॅल आहे आणि ती त्याच्यासाठीच बनवलेली आहे. कागदाचा गोळा, संत्री किंवा बॉल दिसला की तो त्याच्याशी खेळायचा. त्याचे पाय आपोआप किक-अप करत असत किंवा तो पाठीमागून ती वस्तू डोक्यावर उचलून पायावर पडू सोडत असे. हे चक्र असेच चालू राहिले. सिंह आणि माणूस यातील फरक असा की, माणूस संपूर्ण टीमला प्रेरणा देतो. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील योगेश वाझेंनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सिंहासारखी बहादुरी दाखवली, तसा मेस्सीमधील ‘सिंह’ही जागा होईल, याची मला खात्री आहे. मुंबईतील वाझे यांना त्यांचा दोन वर्षांचा मुलगा निभीष पीएफआयसी-२ म या आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले होते. या आजारात यकृत हळूहळू निरुपयोगी होऊ लागते. ही एक दुर्मिळ स्थिती आहे, यामध्ये एक लाखातील एका नवजात बालकावर परिणाम होतो. जगात या श्रेणीतील दहा लाख मुलांपैकी केवळ एक किंवा दोनच यकृत प्रत्यारोपण होतात. योगेश यकृत दानासाठी उपयुक्त होते, पण त्यांचे वजन जास्त होते. त्यांनी फिटनेस ट्रेनरची नेमणूक केली आणि वजन कमी करण्याचा प्लॅन बनवला. त्यांनी हिरव्या भाज्यांसोबत प्रोटीन आहार घेण्यास सुरुवात केली, त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स नसतात. जेवण, व्यायाम आणि कार्यालयीन कामातील शिस्त यामुळे त्यांनी अवघ्या दोन महिन्यांत १० किलो वजन कमी केले. ऑक्टोबरमध्ये त्यांच्यावर दाता म्हणून शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची शस्त्रक्रिया सात तास आणि मुलाची आठ तास चालली. २८ दिवस आयसीयूमध्ये राहिल्यानंतर निभीष आता तंदुरुस्त आहे. वडील आपल्या मुलासाठी नक्कीच सिंह ठरले! मी निभीषची कथा वाचत होतो तेव्हा माझ्या मनात ज्यांच्या वडिलांचा कोविड महामारीत मृत्यू झाला आणि आता ते आपला उदरनिर्वाह करतात म्हणजेच आपल्या कुटुंबासाठी सिंहाची भूमिका बजावतात अशा मुलांबद्दल भावना उचंबळून आल्या. मार्च २०२० मध्ये कोविड सुरू झाल्यापासून एकट्या महाराष्ट्रात २८,८०२ मुलांनी त्यांचे पालक गमावले. त्यापैकी २९१९ माता आणि २५,८८३ वडील होते. कुणास ठाऊक, या कुटुंबांमध्येही आईच सिंहिणीच्या भूमिकेत मुलांचे रक्षण करत असेल! त्या सर्वांना माझा सलाम.

फंडा असा ः जंगलात सिंहाला कोणी राजा बनवत नाही की कोणी कुणाला कुटुंबप्रमुख बनवत नाही. ते स्वतःच जबाबदारी घेतात. आणि ते कधीही मी राजा किंवा राणी आहे, असे म्हणत नाहीत, कारण ते सिंह असतात!

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...