आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सपर्ट Q & A:सलग दोन आठवडे उदासीनता नैराश्याचे प्रमुख लक्षण

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

११ ऑगस्टच्या अंकात नैराश्याशी संबंधित एक लेख प्रसिद्ध झाला होता. यासंदर्भात वाचकांनी मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले आहेत. ही आहेत मुख्य प्रश्नांची उत्तरे...

Q. नैराश्याच्या निदानासाठी कोणती चाचणी आहे? -कोणत्याही रक्त किंवा रेडिओलॉजिकल चाचणीद्वारे नैराश्य ओळखता येत नाही. हे केवळ क्लिनिकल चाचण्यांद्वारे ओळखले जाऊ शकते.

Q. नकारात्मक विचार येतात. हृदयाचे ठोके तीव्र होतात. झोपही कमी होते. हे नैराश्य आहे का? -स्वतःबद्दलचे नकारात्मक विचार, कमी झोप आणि चिंता ही नैराश्याची सामान्य लक्षणे आहेत. कधी कधी उदासीनता जास्त झोप किंवा जास्त भूक याद्वारे दर्शवले जाते. याला कम्फर्ट ईटिंग म्हणतात. हेदेखील नैराश्याचे लक्षण आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरील लक्षणे किमान २ महिने टिकली पाहिजेत.

Q. रजोनिवृत्तीमुळे नैराश्य येते का? -रजोनिवृत्तीमध्ये शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात हार्मोनल बदल होतात. हाॅट फ्लस, झोप न लागणे, मूड बदलणे आणि बऱ्याच बाबतीत नैराश्यदेखील अनुभवले जाऊ शकते.

Q. साइड इफेक्टमुळेही नैराश्य येऊ शकते का? -अशी अनेक औषधे आहेत, ज्यामुळे नैराश्य येऊ शकते. काही सामान्य औषधे, उदा. बीटा ब्लॉकर्स, ज्याचा वापर उच्च रक्तदाब, मायग्रेन आणि हादरे कमी करण्यासाठी केला जातो, यामुळे नैराश्य येऊ शकते. इतर औषधे उदाय कॉर्टिकोस्टिरॉइड्स आणि पार्किन्सन रोगावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळेदेखील नैराश्य येऊ शकते.

Q. नैराश्यासाठीची औषधे जीवनभर घ्यावी लागतात का? -नैराश्याच्या उपचारात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नयेत. नैराश्याच्या पहिल्या भागातून पूर्ण रिकव्हरीनंतर १२ महिने अँटी-डिप्रेसंट्स घेणे आवश्यक आहे. उदासीनतेचा वारंवार त्रास होत असल्यास किमान ३-५ वर्षे औषधे घेणे योग्य आहे. तथापि नैराश्याच्या तीव्रतेवर आणि झटक्याचा कालावधी इ.नुसार ते बदलू शकते.

डॉ. अमित जुत्सी एमबीबीएस, एमडी, अॅपवर्थ आणि मिचम हाॅस्पिटलमध्ये मेलबर्न बेस्ड सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...