आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:राजपथ ते ‘कर्तव्य पथ’ या प्रवासात एक संदेश

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिशांनी राजपथाच्या रस्त्याला किंग्जवे असे नाव दिले, कारण ब्रिटनच्या राजाचे प्रतिनिधी व्हाइसरॉय/गव्हर्नर जनरल त्यावर चालत असत. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. आपले संविधान तयार झाले. मग या मार्गाचे राजपथ असे नामकरण करण्यात आले. राजपथ हे नाव देशातील जनता राज्य करत असल्याची साक्ष होती. पण, आज ७० वर्षांनंतर याला कर्तव्य पथ नाव देण्यात आले आणि त्याला भव्यता देण्यात आली, तेव्हा लोकशाहीत कर्तव्याचा मार्ग केवळ सत्तेतील लोकांसाठीच नाही तर जनतेसाठीही असतो, हे विसरता कामा नये. संविधानाच्या कलम ५१-अ मध्येही मूलभूत कर्तव्य आले आहे, हे विसरू नये. हा मार्ग फूड कोर्ट, लेव्हल टॉयलेट आणि सार्वजनिक सुविधांसह आलिशान पिकनिक स्पॉट म्हणून विकसित करण्यात आला आहे. आता रस्त्यावरील विक्रेत्यांऐवजी दर्जेदार खाद्यपदार्थ मिळतील अशी दुकाने तिथे असतील. इथपर्यंत ठीक आहे, पण हे विसरता कामा नये की, एखादा गरीबही बायको-मुलांसह दुचाकीवर यायची आणि मुलाच्या हातात दोन रुपयांचा फुगा देऊन दहा रुपयांची काॅटन कँडी बायकोला देऊन रस्त्याच्या कडेला तीन किलोमीटर लांबीच्या हिरवळीवर बसून घरी बनवलेले पराठे आणि भाजी खाण्याचा पूर्ण कुटुंब आनंद घेत असे. नव्या भव्यतेमध्ये घरून अन्न आणण्यावर बंदी असेल. मग त्या रस्त्यावरील विक्रेत्यांचे काय?

बातम्या आणखी आहेत...