आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री म्हणाली:आई ही आपल्या मुलीची पहिली मैत्रीण असते : कशिश दुग्गल

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सपनों की छलांग’ या आगामी मालिकेत आजच्या काळाच्या एका मुलीची गोष्ट आहे, जिने आपल्या ड्रीम कंपनीत यशस्वी होण्याचा निर्धार केला आहे. तिला नेहमी हा एकच प्रश्न पडतो की, मुली, आपल्या स्वप्नांची भरारी का मारू शकत नाहीत?

बॉलीवूड चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिका या दोन्ही प्रांतात मुशाफरी करणाऱ्या कशिश दुग्गलने सुमन यादव ही प्रमुख नसली तरी महत्त्वाची भूमिका करण्याचा निर्णय घेतला आहे. ती एक स्वाभिमानी स्त्री आहे आणि आपल्या मुलीचा आधारस्तंभ आहे. या भूमिकेत आणि तिच्यात काय साम्य आहे याविषयी बोलताना कशिश म्हणाली, “राधिकाची आई करताना मी स्वतः आहे त्यापेक्षा फारसे काही वेगळे करावे लागत नाहीये. एक आई म्हणून मीदेखील चिंता करते, मला अनेक गोष्टींची काळजी असते, पण त्याच वेळी मुलांच्या स्वप्नामध्ये आपण विश्वास दाखवणे महत्त्वाचे असते. माझ्या मुलीला बहरण्यासाठी, तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तिला सर्व संधी देण्याची माझी इच्छा आहे. आई ही तिच्या मुलीची पहिली मैत्रीण असते. आणि ही मुलगी जेव्हा मोठी होते, तेव्हा आई तिच्या खांद्याला खांदा भिडवून तिच्या सोबत उभी राहते, तिला गरज भासेल तेव्हा तिला आधार देण्यासाठी!”

या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना कशिश म्हणाली, “राधिकाची आई ही बरीचशी मिलेनियल्स/जेन झेडच्या मातांसारखीच आहे, ज्यांना हे माहीत असते की, भय आणि चिंता तर नेहमी असणारच पण आपण हा विश्वास कायम ठेवला पाहिजे की आपल्या मुली मुलांपेक्षा जराही कमी नाहीत. मला माझी व्यक्तिरेखा आवडली आहे, कारण ती खूप छान रेखाटलेली आहे, आणि त्यात एका अशा आईची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, जिची मुलगी तारुण्यात पदार्पण करत आहे आणि या जगातील वास्तवाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मला आशा आहे की, प्रेक्षकांना ही मालिका आवडेल. ही एक खास कहाणी आहे आणि माझ्या अंतःकरणाच्या खूप जवळ आहे.”