आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराम्युच्युअल फंडात नामांकनाची डेडलाइन आता वाढून ३० सप्टेंबर झाली आहे. याआधी ३१ मार्च शेवटची तारीख होती. स्कीम मॅच्योर होण्याआधी गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास संपत्ती हस्तांतरणात अडचण येऊ नये यासाठी सेबी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना नामांकन पूर्ण करण्यासाठी भर देत आहे की, याची माहिती जाणून घेऊया...
{म्युच्युअल फंडात नॉमिनेशन कसे करावे? म्युच्युअल फंडात नवे गुंतवणूकदार असाल तर खाते सुरू करण्याच्या अर्जात नॉमिनेशनचे स्वतंत्र विभाग असतो. जुने म्युच्युअल फंड गुंतवणूकदार असाल तर सांगितलेल्या फॉर्मेटमध्ये नॉमिनेशन फॉर्म भरून म्युच्युअल फंड हाऊसच्या अधिकृत गुंतवणूक सेवा केंद्रात जमा करावे लागेल. {नॉमिनी एकापेक्षा जास्त असू शकतात का? तुम्ही एकदा नॉमिनी निवडल्यानंतर आपल्या इच्छेनुसार बदल करू शकता. एक म्युच्युअल फंड गुंतवणूकदार जास्तीत जास्त ३ व्यक्तींना नामांकित करू शकतो. गुंतवणूक रकमेचा हिस्सा पुढच्या रकान्यात भरावा लागेल. {म्युच्युअल फंडचे खाते संयुक्त असेल तर? गंुतवणूकदारास नॉमिनी फॉर्मवर स्वाक्षरी करावी लागेल. त्याचे म्युच्युअल फंड खाते संयुक्त असेल तर नॉमिनी फॉर्ममध्ये दोघांची स्वाक्षरी अनिवार्य असेल. {जास्त गुंतवणुकीवर नॉमिनी वेगळे असतील? हाेय. तुम्हाला प्रत्येक म्युच्युअल फंडात केलेल्या नव्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या नॉमिनी ठेवावे लागतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.