आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेस्टसेलरची शिकवण:नव्या जीवनाकडे पहिले आवश्यक पाऊल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रायना वेस्ट यांचे “द माउंटन इज यू” हे आत्म-शोधावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक मानले जाते. ते सांगते की, आपणच अनेकदा आपल्या मार्गात अडसर होतो, खरे तर तेव्हा आपल्याला नव्या जीवनाकडे एक पाऊल पुढे टाकण्याची गरज असते.

स्वत:ला चांगले जाणून घ्या आपल्या अनेक गरजा असतात. यापैकी बऱ्याच आपल्याला माहीतही नसतात, परंतु त्या आपल्या सुप्त मनात असतात. कळत-नकळत आपण आपल्या इच्छेचा मार्ग अडवतो, त्यामुळे आपल्याला नैराश्य येते, पण त्याचे कारण समजत नाही. तेव्हा स्वत:बद्दल सखोल समज विकसित करणे आवश्यक होते. उदा. एखाद्या अशा नात्यात असणे, जिथे आपल्याला स्वतःसाठी जागा हवी आहे, परंतु एकटे राहू नये अशीदेखील इच्छा आहे. आपण आपल्या गरजा चांगल्या प्रकारे समजून घेतल्या नाहीत, तर नात्यात नेहमीच समस्या येतात. आतला डोंगर आपल्यालाच पार करावा लागतो.

बदलाला घाबरू नका बरेच लोक सेल्फ-हीलिंग प्रक्रिया थांबवतात, कारण यामुळे जीवन बदलेल हे त्यांना माहीत असते. यामुळे कदाचित ते मित्र आणि सोबती गमावू शकतात किंवा पूर्वीपेक्षा कमी आवडते होऊ शकतात. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या जीवनाची केंद्रे पुन्हा शोधावी लागतील, पण यथावकाश नवीन कम्फर्ट झोन तयार होईल.

आयुष्यात पुढे जावे आपली स्व-उपचार प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपले खरे सहकारी दुसऱ्या टोकाला भेटतील. ते आपले स्वागत करतील. तेव्हा आपल्या लक्षात येईल की, आवडण्यापेक्षा प्रेम करणे आणि समजून घेण्यापेक्षा ओळखले जाणे चांगले. आपल्याला पुढे नेणाऱ्या गोष्टींच्या मागे जाणे थांबवू नये. नव्या परिस्थितीतही आपण नाॅर्मल होऊ.

निर्णय आपल्या हातात आपल्या मार्गात कोणी उभे असेल तर ते आपणच असतो. आणि कोणी रक्षण करू शकत असेल तर ते आपल्याशिवाय दुसरे कोणीही नाही. स्वतःचा मार्ग बनवा आणि त्यावर पुढे जात राहा. शेवटी निर्णय आपलाच आहे. व्यक्तिमत्त्व निर्मिती माणसांची रचना अशी आहे की, त्यांना कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडते. यामुळे त्यांना सुरक्षित वाटते. त्यांना माहीत असलेल्या गोष्टींकडे पुन्हा पुन्हा जायचे असते. या नादात ते कधी कधी याहूनही चांगल्या परिस्थितीला मुकतात. पण यथावकाश आयुष्यात काही अस्वस्थ निर्णय घ्यावेच लागतात. आपले व्यक्तिमत्त्व त्यांच्यापासूनच घडते.

मुळापर्यंत जा सर्वात महत्त्वाचे, आपल्या गरजा काय आहेत हे जाणून घ्यावे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पूर्ण करण्यासाठी निरोगी मार्ग शोधणे. आपल्या वर्तन-नमुन्यांच्या मुळाशी जात नाही तोपर्यंत सेल्फ-हीलिंग करू शकणार नाही. आपण जे करतो ते का करतो हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आपण वरवरच्या समस्या सोडवू शकत नाही.

ब्रायना वेस्ट

बातम्या आणखी आहेत...