आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया आठवड्यात दिल्ली-जयपूर महामार्गावरील लाँग ड्राइव्हदरम्यान मला खरोखर असे वाटले की, जनजीवन आता प्री-कोविड युगात परतले आहे. रस्ते जाम झाले होते, लोक रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून आपल्या गाड्या काढण्याच्या घाईत होते, स्वयंचलित टोल गेटवर गाड्यांमधील धुळीमुळे फास्टॅग स्कॅनला उशीर होत असताना लोक इतरांची पर्वा न करता विनाकारण ओरडत आणि हॉर्न वाजवत होते. लोक प्रवासाच्या मूडमध्ये असून हिवाळ्याचे दिवस असूनही बाहेर पडण्यासाठी तयार आहेत. मीदेखील घनदाट झाडांच्या रांगा असलेल्या अरुंद रस्त्यावरून गेलो आणि माझे डोळे उत्तम बसण्याची व्यवस्था आणि वाय-फाय असलेले कॅफे शोधत होते, जेणेकरून मी माझ्या लॅपटॉपवर कथा टाइप करू शकेन, कॉफी पिऊ शकेन, माझ्या आवडीची बिस्किटे खात आकाशातून जाणारी विमाने पाहू शकेन आणि झाडांवरील पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू शकेन. पण, मला अशी जागा मिळाली नाही.
तेव्हा माझ्या लक्षात आले की, देशाच्या काही भागात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी हे बदल लक्षात घेतलेले नाहीत, हे बदल महामारीनंतरही राहणार आहेत. बदल म्हणजे घरून काम करणे हे गिग कामगार आणि नियोक्ते यांच्यात को-वर्किंग कॅफेचा ट्रेंड ज्या भागात जास्त आयटी प्रोफेशनल्स आहेत त्या भागात वेगाने पसरत आहे. दक्षिणेतील आणि गोव्यातील हॉस्पिटॅलिटी मालकांना हे इशारे समजले आहेत आणि ते तिथून काम करणाऱ्यांसाठी हा अनुभव आरामदायक बनवण्यासाठी सर्व सुविधा पुरवत आहेत. कॅफे मालकांच्या म्हणण्यानुसार, हा ट्रेंड महामारीनंतर सुरू झाला आणि तेव्हापासून या कॅफेमध्ये लोकांची संख्याही थोडी वाढली आहे. त्यांनी प्रत्येक आसनाच्या बाजूला चार्जिंग पॉइंट बनवले आहेत आणि या जागा स्पाइसजेटसारख्या नाहीत, जिथे जाड माणसाला पुतळ्यासारखे बसावे लागते, या जागा रुंद आहेत आणि पाठीला आधार देण्यासाठी उशादेखील आहेत. या आसनांवर बसून हलकी डुलकीदेखील घेता येते. याव्यतिरिक्त या कॅफेमध्ये नेहमीच वेगवान वाय-फाय, भरपूर बोर्ड गेम्स, तसेच वेगळ्या वाचनाच्या मूडमध्ये असाल तर विविध प्रकारच्या पुस्तकांची लायब्ररी आहे. काही कॅफेंनी पुस्तकांच्या दुकानांशी करार केला आहे, ते कॅफेमध्ये काही नमुना पुस्तके ठेवतात. नियमित अभ्यागतांसाठी साप्ताहिक-मासिक पासदेखील आहेत, तेथे ते जेवणाची ऑर्डर न देता कित्येक तास बसू शकतात. या पासधारकांना हिवाळ्यात स्वतःला उबदार ठेवण्यासाठी कॉफी/चहासोबत मोफत जेवणही मिळते. मी म्हणेन की, घराबाहेर मोठी बाग असल्याने ज्यांना हाॅस्पिटॅलिटी व्यवसायात हात घालायचा आहे त्यांनी त्यांच्या बागेचे रूपांतर ‘विंटर कॅफे’मध्ये करावे (हे फक्त हिवाळ्याच्या महिन्यांतच चालेल) आणि वर्क फ्राॅम होम करणाऱ्या स्थानिक लोकांना अनुभवण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे. तुमच्याकडे पुस्तकांचा चांगला संग्रह असल्यास तो व्यवस्थित करा आणि त्यात काही हलके वाद्य संगीत जोडा. सुरुवात करण्यासाठी हा एक हंगामी व्यवसाय करा. कोणास ठाऊक, तो कदाचित लोकांना एकत्र येण्याची संधी देणाऱ्या एका शाश्वत व्यवसायात बदलू शकतो.
फंडा असा ः एखाद्याच्या कामाच्या आयुष्याला ‘फन लव्हिंग कॅफे लाइफ’मध्ये बदलणे हा चांगला व्यवसाय आहे, कारण भविष्यात एकटेपणा हा एक मोठा आजार होणार आहे, तो हळूहळू वाढत आहे.
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.