आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • A Pleasant Start To The Morning Will Make The Day Go Well | Article By Shaman Mittal

आरोग्य मंत्र:सकाळच्या प्रसन्न सुरुवातीने दिवस जाईल चांगला

शमन मित्तल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न सकाळने झाली पाहिजे आणि प्रसन्न सकाळची सुरूवात काही चांगल्या सवयींनी झाली पाहिजे. सकाळच्या काही सवयी अंगीकारल्याने आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य देणे आपल्यासाठी सोपे होऊ शकते. आपण जागे होताच जो काही विचार करतो िकंवा निर्णय घेतो, ते आपल्या मेंदूत पक्कं होतं. अशा काही सवयी सकाळी उठल्यानंतरच्या दिनचर्येमध्ये सामील करता येतील. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात...

गजर बंद केल्यावर पुन्हा झोपू नका अनेकदा लोक आपल्या मोबाइलमध्ये गजर लावतात, नंतर सकाळी तो बंद करतात आणि पुन्हा झोपतात. ही अनियमित दिनचर्या टाळण्यासाठी मोबाइलऐवजी घडळ्यात गजर लावा. घड्याळ आपल्या पलंगापासून दूर ठेवा, कारण ते बंद करण्यासाठी तुम्हाला अंथरुणातून उठावेे लागेल.

अंथरुणातून झटक्यात उठू नका सकाळी उठताना डावी किंवा उजवी बाजू घेऊन उठावे. याच्या मदतीने कंबरेला अनावश्यक दबावापासून वाचवता येते. सकाळी उठल्यानंतर एक किंवा दोन मिनिटे पलंगावर बसून रहा. जेणेकरून शरीराला आराम मिळेल. घाबरून घाईघाईने उठणे टाळा. संपूर्ण शरीरात योग्य रक्ताभिसरण होऊ द्या.

उठल्या उठल्या फोन बघू नका सकाळी उठल्या उठल्या फोन हातात घेऊ नका. रात्रभर फोन लांब असतो म्हणून आपण तो सकाळी उठताच बघतो. पण, असे केल्याने फोनमध्ये आलेले मेसेज, बँक खात्यासंबंधी शिलकीचे मेसेज यामुळे मेंदूवर ताण येतो. या तणावातच तासन‌् तास निघून जातात. म्हणूनच किमान सकाळचे काही तास फोनचा वापर करू नका. थेट जमिनीवर पाय ठेवू नका सकाळी उठल्याबरोबर पाय थेट जमिनीवर ठेवू नयेत, कारण आपण झोपतो तेव्हा आपण आपले पाय चादर किंवा रजईने झाकतो. त्यामुळे संपूर्ण शरीरातील उष्णता वाढते. पायही गरम होतात, त्यामुळे सकाळी गरम पाय अतिशय थंड जमिनीवर ठेवल्यास आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकते. सूर्यप्रकाशाचा प्रवेश सकाळची सुरुवात करण्यासाठी घरात सूर्यप्रकाश आल्याने मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणूनच सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर खिडक्यांचे पडदे उघडा. डोळे आणि चेहरा धुवा अंथरुणातून उठल्यानंतर डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा करा. यामुळे डोळे आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल. तसेच मुरुमांपासून चेहऱ्याचे रक्षण होईल.

एक - दोन ग्लास पाणी प्या आपल्या सर्वांना माहीत आहे की, दिवसभर हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी आवश्यक आहे. म्हणूनच सकाळी रिकाम्या पोटी एक किंवा दोन ग्लास पाणी पिणे या संपूर्ण प्रक्रियेला पुढे नेते. असे केल्याने पोट चांगले राहते, त्वचा उजळते. त्यामुळे आम्लपित्त आणि बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.

स्ट्रेचिंग करा सकाळी आपल्या शरीरात जडपणा जाणवतो. शरीरातील स्नायूंना लवचिक बनवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर १ ते २ मिनिटे स्ट्रेचिंग करावे. यामुळे स्नायूंना आराम मिळताे आणि रक्तप्रवाह सुधारतो. शरीरात आरोग्याची कोणतीही समस्या नसल्यास, बेडवरून उठून जमिनीवर उभे राहिल्यानंतर, एक मिनिट जागेवर उभे राहून हलकी उडी मारू शकता.

पलंगावर आरामात बसा झोपेतून उठल्याबरोबर काम करण्याची घाई करण्याऐवजी, किमान पाच मिनिटे अंथरुणावर बसा. शरीर आणि मन शांत करण्यासाठी डोळे बंद करून ध्यान लावण्याचा प्रयत्न करा. पाच मिनिटांनंतर हाताचे तळवे एकमेकांवर चोळा आणि तीन वेळा डोळ्यांवर लावा. त्यानंतर सावकाश बेडवरून उठा.

बातम्या आणखी आहेत...