आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराQ. हॅपिनेस इंडेक्समध्ये बांगलादेश व पाकिस्तानपेक्षाही भारत मागे का?
संबित पात्रा मला कळतच नाही की पॉलिटिक्समधील सर्वात चांगले कॉमेडियन आमच्याकडे आहेत. तरीही आम्ही यात मागे कसे? याला काँग्रेसच जबाबदार..
शिवराजसिंह चौहान हे सगळे विरोधी पक्षांनी रचलेले कारस्थान आहे. ते जाणीवपूर्वक दु:खी राहून आमच्या हॅपिनेस इंडेक्सची स्थिती खराब करत आहेत. हे बरोबर नाही..
लालू यादव मला दीर्घकाळ कारागृहात ठेवण्याचा हा परिणाम.. माझ्यावर घोटाळ्यांचे कितीही आरोप लावा, पण मी हॅपिनेस इंडेक्स वाढवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
Q. उद्धव ठाकरेंचे भवितव्य काय?
ममता बनर्जी
कोलकात्याच्या एका दैनिकात कार्टूनिस्टचे पद रिकामे झाले आहे, इच्छा असल्यास मी नोकरी मिळवून देऊ शकते.
निर्मला सीतारमण नेहमीच ओरडत होते की रुपया घसरत आहे, अाता त्यांच्याकडे वेळ आहे, जेथे पडेल तेथे जाऊन त्यांनी सावडून घ्यावा.
मनीष सिसोदिया रिकामे बसलात, माझ्यासारखे तुम्ही कारागृहात का येत नाही उद्धवजी? तुम्ही आणि मी एकाच पक्षाकडून पीडित आहोत.
Q. देशाच्या जीडीपीची काय अवस्था आहे ...
आलिया भट्ट जी, डीपी तर कालच बदलला इन्स्टावर. वीस लाख लोकांनी लाइक केले.
बाबा रामदेव बेटा, कपालभाती करत जा, त्यामुळे मन प्रसन्न राहील. जीडीपीसारखे प्रश्न मनातही येणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.