आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक:सोन्यातील सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक

प्रथमेश मल्या, डॉ. संजय मित्तल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आ पल्याकडे लोक वेगवेगळ्या ठिकाणी भांडवल गुंतवतात. यापैकी सोन्यात गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित मानले जाते. सोन्याची नाणी आणि दागिन्यांची सर्वाधिक खरेदी केली जाते. या प्रकारच्या सोन्याला भौतिक सोने (फिजिकल गोल्ड) म्हणतात. तुम्हाला भविष्यासाठी फक्त सोन्यातच गुंतवणूक करायची असेल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोन्याची प्रत्येक गुंतवणूक वेगळी असते आणि त्याचे फायदेही वेगळे असतात. त्यामुळे आपल्यासाठी कोणते चांगले आहे, ते जाणून घ्या.

सोने ईटीएफ गोल्ड ईटीएफ म्हणजेच गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड एफडीपेक्षा जास्त परतावा देऊ शकताे. हे असे फंड आहेत, जे सोन्यात गुंतवणूक करतात. ते सामान्य शेअरप्रमाणे खरेदी आणि विकले जाऊ शकतात. गोल्ड ईटीएफसाठी डिमॅट खाते आवश्यक आहे. गोल्ड ईटीएफ स्टॉक एक्स्चेंजवर खरेदी किंवा विकले जातात. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान एक युनिट खरेदी करणे आवश्यक आहे. एक युनिट म्हणजे एक ग्रॅम सोन्याएवढे असते. जेव्हा तुम्ही ते विकाल तेव्हा तुम्हाला त्यात सोने मिळणार नाही, पण त्या वेळच्या बाजारभावाइतकी रक्कम मिळेल. सॉव्हरिन गोल्ड बाँड सॉव्हरिन गोल्ड बाँड कागदी स्वरूपात असतात आणि भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केले जातात. बाँडमध्ये किमान गुंतवणूक १ ग्रॅमपासून केली जाऊ शकते आणि गुंतवणूकदार ४ किलोपर्यंत खरेदी करू शकतो. ते सुरुवातीच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला २.५% दराने सहामाही व्याज देते. ते ८ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीपर्यंत धरले असेल, तर त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. बाँडची मुदत ८ वर्षांसाठी असतेे. ५ वर्षांनंतर रिडीम करण्याचा पर्याय आहे, जो व्याज देय तारखेला रिडीम केला जाऊ शकतो. गुंतवणूकदार हा बाँड तारण ठेवून कर्जदेखील घेऊ शकतो, जे बाँड जारी केल्यापासून १५ दिवसांच्या आत घेता येते. यावर जीएसटी भरण्याची गरज नाही.

डिजिटल सोने हा एक ऑनलाइन सोने खरेदी करण्याचा मार्ग आहे. ते विकत घेऊन वॉलेटमध्ये साठवले जाते. हे सोने खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचे खऱ्या सोन्यात रूपांतर करता येते. त्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. यामध्ये ३ टक्के जीएसटी भरावा लागतो. यासोबतच डिजिटल वॉलेटमध्ये सोने ठेवण्यासाठी काही रक्कम भरावी लागते. बाजारातून किमान एक ग्रॅम सोने खरेदी करावे लागते, ज्याच्या किमतीत दररोज चढ-उतार होत राहतात. परंतु, तुम्ही १ रुपया इतक्या कमी किमतीत डिजिटल सोने खरेदी-विक्री करू शकता.

गोल्ड म्युच्युअल फंड हा म्युच्युअल फंड सोन्याच्या वाढ आणि घसरणीवर आधारित असतो. या फंडात गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही डिमॅट खात्याची आवश्यकता नाही. गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये फक्त एका सामान्य खात्यातून आणि सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करता येते. विश्वासू फंड हाऊसच्या वेबसाइट किंवा शाखेला भेट देऊन गुंतवणूक करू शकता. गुंतवणूकदार एसआयपीद्वारे यामध्ये गुंतवणूक करू शकतात, जे ईटीएफमध्ये शक्य नाही. या फंडासाठी मासिक एसआयपी म्हणून किमान १००० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. एसआयपी गुंतवणूक रक्कम कमी खर्चात चांगला परतावा देते. गोल्ड म्युच्युअल फंड ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. हे फंड नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे नियंत्रित केले जातात.

गुंतवणुकीतील फरक समजून घ्या धातूच्या स्वरूपात सोने खरेदी केल्यास खरेदीची किंमत आणि विक्री किंमत यातील फरक म्हणजे नफा होय. तथापि, जे लोक प्रत्यक्ष सोने खरेदी करतात, ते अत्यंत निकड असल्याशिवाय ते विकण्याचा विचार करत नाहीत. त्यामुळे या बाबतीत परताव्याचा दृष्टिकोन शून्य आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड्स (एसजीबी) च्या बाबतीत सोन्याची गुंतवणूक भौतिक पद्धतीने आणि विविधता ठेवण्याऐवजी डिजिटल मार्गाने केली जाते. त्यामुळे जे एसजीबीमध्ये मुदतपूर्तीपर्यंत गुंतवणूक करतात, त्यांना व्याज तसेच भांडवलवाढीचे फायदे मिळू शकतात, जे सोन्यामध्ये गुंतवणुकीच्या इतर कोणत्याही पर्यायासह उपलब्ध नाही. ईटीएफ आणि गोल्ड फंडांच्या बाबतीत विचार केल्यास ते सोन्यामध्ये परतावा दर्शवतात. कारण या पद्धतीत भौतिक सोन्याचा आधार आहे. त्यामुळे विशिष्ट वर्षात सोन्याच्या किमती कशा होत्या यावरून परतावा स्पष्ट केला जातो. हा पर्याय सोन्याच्या किमतीतील परताव्याच्या आधारे नफा देतो, एसजीबीच्या तुलनेत तो फायदेशीर आहे.