आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक भविष्याचा आधार:शिक्षक मुलासाठी रस्ता बनवत नाही, ते त्याला रस्ता बनवायचे शिकवतात

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आपली स्वप्ने असतात, काय व्हायचे आहे आणि काय प्राप्त करायचे आहे. स्वाभाविकपणे मुलांमध्ये आयुष्य आणि त्याच्या चढ-उताराबाबत कमी अनुभव असतो म्हणून तो सहज मनाने स्वप्न बघतो. तो अशक्यही मिळवण्याचे स्वप्न पाहतो. जसे, मंगळावर जाणे, पक्ष्यासारखे उडणे, सामाजिक परिवर्तन करणे.

यामुळे मुलांचा उत्साह कमी न करता आयुष्याबाबत त्याला निराश न करता त्याचे मार्गदर्शन करण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. शिक्षक शिकण्याची ज्योत पेटवू शकतो, मुलांचे कुतूहल जिवंत ठेवू शकतो. शिक्षक मुलासाठी रस्ता तर बनवू शकत नाही, मात्र तो मुलाला नक्कीच शिकवतो की, त्याला त्याचा मार्ग कसा बनवायचा आहे. जे काही नवीन आहे त्यासाठी आधीपासून कोणताच मार्ग तयार नाही.

मुलासाठी आवश्यक आहे की, त्याला या गोष्टीचे आकलन करता यावे की काय योग्य व काय अयोग्य आहे. जे चुकीचे आहे ते बरोबर करण्यासाठी आत्मविश्वास, स्वत:ची आकलन क्षमता, आपल्या चुका स्वीकारण्याची क्षमता आवश्यक असते. अनेक वर्षांच्या अनुभवातून मी ‘शिकण्याची क्षमता शिकणे’ ही विशेषत: ओळखली आहे. शिक्षकाने मुलांना चमच्याने खाऊ घालायला नको. उच्च माध्यमिक मंडळ आणि दिल्ली विद्यापीठात अव्वल येण्याचा माझा अनुभव सांगतो की, मुलात आवड निर्माण करण्याची शिक्षकाची भूमिका आहे. मला जाणवले की, कोणीही ताकद, पद आणि समाज वा संस्थेत पदाच्या मागे पळू नये. तुमची समज विकसित करण्यासाठी हे गैरसमज कमी करायला हवेत. सामाजिक वास्तव खूप कठीण असते आणि हे गैरसमज वास्तव बघणे- समजून घेण्यापासून राेखतात. माझा अनुभव सांगतो की, मुलाने शिकायचे कसे शिकायचे यासाठी शिक्षकाने मुलाची मदत करायला हवी. त्याला वास्तव चांगल्या प्रकारे समजून घेता येईल यासाठी शिक्षक गैरसमज दूर करण्यात मदत करू शकतो. मुल जे शिकत आहे ते आपल्या आसपासच्या आयुष्याशी जोडणे महत्वाचे आहे. महान सुधारक गांधीजींनी त्यांच्या ‘नई तालीम’मध्ये यावर जोर दिला होता.

प्रा. अरुणकुमार जेएनयूतून निवृत्त

बातम्या आणखी आहेत...