आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • A Teacher Is Needed To Teach, Failure Is Also A Teacher | Blog By Salman Khan

पॉझिटिव्ह ब्लॉग:शिकवण्यासाठी गुरू आवश्यक, अपयश हासुद्धा शिक्षक असतो

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपयश हेसुद्धा शिक्षकच असतात. मी नोकरी सोडून गणिताचे यूट्यूब व्हिडिओ बनवून शिकवायला सुरुवात केली तेव्हा यश अचानक मिळाले नाही. त्या ८ महिन्यांत उत्पन्न शून्य आणि घरखरेदीसाठी वाचवलेले पैसेही खर्च होत होते, हळूहळू आम्ही अनेक गावे, शहरे आणि देशांत पोहोचलो...

शिकवण्यासाठी मार्गदर्शक आवश्यक आहे. अनेक मार्गदर्शकांच्या मदतीनेच माझ्या प्रवासाला योग्य दिशा मिळाली. प्रथम मार्गदर्शक थॉमस कोरियन यांनी शिकवले की परिस्थिती कोणतीही असो, जग, सभोवतालच्या लोकांना चांगले बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणखी एक मार्गदर्शक डॅन वॉल यांनी शिकवले, तुमच्या छंदांसाठी वेळ काढा, तरच कामगिरी चांगली होईल. तेव्हाच मी माझ्या छंदासाठी म्हणजे शिकवण्याला वेळ देऊ लागलो. ध्यान सुरू केले. शिक्षणामुळे जीवनात अनेक मार्ग खुले होतात पण अनेक रस्ते स्वत:ला तयार करावे लागतात. नोकरीच्या ध्येयाशिवाय जीवनात छंद असला पाहिजे. गणित शिकवणे हा माझा छंद होता. २००४ मध्ये चुलत भावांना शिकवायला सुरुवात केली. मला वाटले की मी गणित आणि विज्ञान समजण्यास सोपे करू शकतो. २००५ मध्ये त्याच्या सरावासाठी सॉफ्टवेअर बनवले आणि २००६ मध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मुलांच्या हातात शिक्षणाचे एक टोक दिले तर ते स्वतःच उडू लागतात. मग ते शिकवण्याबद्दल असो वा समजण्याबद्दल शॉर्टकट घेऊ नका. आजही मी टप्प्याटप्प्याने सांगतो. शिकवताना योग्य भाषा निवडणेदेखील महत्त्वाचे आहे. कारण मुले त्यांच्या स्वतःच्या भाषेत सहज समजतात आणि शिकतात, म्हणून प्रादेशिक भाषेत व्हिडिओ केलेत. आणि शेवटी, मी यशाचा मंत्र सांगेन. शिक्षणाबरोबरच सराव आणि अभिप्राय देण्याची व्यवस्था असावी. संवाद खूप महत्त्वाचा आहे. मी गणित-विज्ञान ज्या गंभीरतेने शिकवले त्याने विद्यार्थी आकर्षित झाले. -सलमान खान, खान अकादमीचे अमेरिकन गणितज्ञ

बातम्या आणखी आहेत...