आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:तुमचे लास्ट इम्प्रेशन हेच लास्टिंग इम्प्रेशन असेल!

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिथे लोकांच्या नेत्रदीपक कामगिरी सामान्य झाल्या आणि जुने विक्रमही नवीन विक्रमांच्या पुरात बुडालेल्या जगात आता ‘फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन’ ही जुनी म्हण मागे पडल्याचे दिसते. विशेष म्हणजे आता ‘तुमचे लास्ट इम्प्रेशनच लोकांच्या स्मरणात कायमची छाप सोडेल’ अशी नवीन आवृत्ती आली . तुम्ही विचार करत असाल, हे काय आहे? माझा तर्क असा - मी सुरुवात एका प्रश्नाने करतो. रिंकूसिंहबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? क्रिकेट न बघणारे विचारतील, ‘कोण आहे रिंकूसिंह?’ आणि क्रिकेटप्रेमी म्हणतील, ‘अरे, तुम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये ५ षटकार मारून केकेआरला जिंकून दिले त्याच्याबद्दल बोलत आहात?’ कदाचित क्रिकेटवेडे म्हणतील, ‘हो, हो, मला रविवारी संध्याकाळची या तरुण खेळाडूची अकल्पनीय फटकेबाजी आठवते. मी पाहिले की, जुही चावलाचे तोंड दोनदा उघडे राहिले आणि लोकांकडे हात उंचावत जणू ती म्हणत होती, ‘माझा विश्वासच बसत नाही.’. केकेआरचा मालक शाहरुख खाननेही पठाण चित्रपटाच्या पोस्टरवर रिंकूचा फोटोशॉप केलेला फोटो ट्वीट केला.

मला आठवते, गेल्या वर्षी रिंकूने डी. वाय. पाटील स्टेडियम (मुंबई) येथे केकेआरकडून खेळताना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध १५ चेंडूंत ४० धावा केल्या होत्या, लखनौच्या २१० धावांचा पाठलाग करताना केकेआरने २०८ धावा केल्या आणि २ धावांनी पराभव पत्करावा लागला. शालेय खेळांमध्ये बाइक जिंकल्याचे त्याचे दशकापूर्वीचे यश कोणालाच आठवणार नाही, त्यामुळे त्याच्या वडिलांचे गॅस सिलिंडर वितरण सोपे झाले. रिंकूने त्याच वेळी जिंकलेल्या जुन्या ट्यूब टीव्हीवर त्याच्या वडिलांनीही रविवारचा सामना पाहिला. त्याचे वडील अजूनही गॅस सिलिंडरच्या गोदामात दोन खोल्यांमध्ये राहतात. त्यांनी आपल्या क्रिकेटपटू मुलाच्या रामबाग कॉलनी, अलिगढ, उत्तर प्रदेश येथील तीन मजली घरात राहण्यास नकार दिला. पालकांच्या निर्णयामुळे रिंकूच्या आयुष्यात फारसा बदल झालेला नाही.रिंकू क्रिकेटप्रेमींच्या, विशेषत: केकेआरच्या चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील, त्याने प्रत्येकाला आपण हरलो असे वाटत असताना संघाला विजयी केले. याच कारणामुळे मागील वेळी भेटलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची चांगली वागणूक किंवा आपण घाबरलेलो असतानाचे हॉस्पिटलमधील नर्सचे विनोद आम्हा सामान्य लोकांच्या लक्षात राहतात. लहानपणी आजीच्या मांडीवर बसल्याचे आपल्याला जास्त आठवते, कारण त्या काम करणाऱ्या आणि सतत घाईत असलेल्या आईपेक्षा जास्त निवांत होत्या. आईच्या खांद्यांवर दुहेरी जबाबदारी होती आणि आजी आराम करायची, यामुळेच आजी-आजोबा नातवंडांना अधिक आवडायचे, हे मुख्य कारण असल्याचे वर्षांनी लक्षात आले. पौगंडावस्थेत रॉक स्टार्स किंवा अॅक्शन हीरोचे पोस्टर्स त्यांना हवी असलेली आदर्श बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड म्हणून असू शकतात, परंतु बारकाईने पाहिल्यास दिसून येईल की, ते हायस्कूलचे शिक्षक किंवा प्राध्यापकांचे गुण मुलांना आत्मसात करण्याची इच्छा असते.

{फंडा असा की, तुमची शेवटची छाप पहिल्यापेक्षा चांगली नसल्यास पहिली छाप जास्त काळ टिकणार नाही. याचे कारण असे की, लोक लास्ट इम्प्रेशनलाच तुमचे अंतिम चित्र मानतात, जोपर्यंत तुम्ही पुन्हा पूर्णपणे नवीन छाप पाडत नाहीत, तोपर्यंत हेच चित्र कायम राहते.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]