आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. काही दिवसांनी दहावीचा निकालही जाहीर होईल. परीक्षा आणि परीक्षेचा निकाल म्हटले की घरोघरी विद्यार्थी, पालक हे दोघेही तणावात असल्याचं चित्र दिसतं. खरे तर मुलांचे त्यांना मिळणाऱ्या गुणांवरून मूल्यांकन करणे चुकीचेच. असे मुल्याकन करताना आपण पालक म्हणून चुकतो. परीक्षेतील गुणांना जीवनात इतके महत्त्व् देतो की कमी गुण मिळाले, पाल्य अपयशी झाला तर जीवनातच तो पूर्णपणे अपयशी झाला असा समज करून घेतो. त्या अनुषंगाने पाल्यांशी आपलं वर्तन ठेवतो. परीक्षेत मिळणारं यश, निकालानंतर मिळणारे गुण म्हणजेच जीवनातील यश आहे आणि त्याशिवाय जीवनात दुसरा पर्यायच नाही ही मानसिकता पालक म्हणून आपल्याला बदलावी लागेल. अशी किती तरी उदाहरणं आहेत की त्या व्यक्ती कमी शिकल्या, शालेय जीवनात खूप चांगले गुण त्यांना मिळाले नाहीत. पण आज त्यांचा नावलौकिक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक सकारात्मक मार्ग आहेत. गरज आहे ती त्यांना धैर्याने शेाधण्याची. उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी ज्यांनी छोट्या व्यवसायापासून सुरुवात केली आणि आज ते देश चालवतात. रमेशबाबू ज्यांनी कटिंग सलूनचा छोटासा व्यवसाय सुरू केला आणि आज अब्जोपती आहेत. हल्दीराम यांनी फुटपाथवरून व्यवसायाला सुरुवात केली आणि आज त्यांची करोडोंची उलाढाल आहे.
आपले पाल्य ज्या शाळेत शिकत असतील तेथील मुख्याध्यापक द्वितीय अथवा तृतीय श्रेणीत पास झालेले असू शकतात. पण ते आज एका शाळेच्या मुख्याध्यापक पदावर आहेत हे विसरून कसे चालेल? पाल्यांना कमी गुण मिळाले म्हणजे ते दुर्लक्षित किंवा पुढे ते आयुष्यात काही करू शकत नाहीत, असा जो पालकांचा दृष्टिकोन असतो, तोच चुकीचा आहे. मार्कांच्या दबावामुळे काही मुले तणावाखाली येतात आणि टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवतात. त्यामुळे पाल्यांच्या बाबतीत असे काही घडू नये असे वाटत असेल तर पाल्य जसे आहेत, तसे त्यांना आनंदाने स्वीकारा. तणावरहित वातावरणात त्यांचे पालनपोषण करा. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम पालकांच्या भूमिकेतून करा. स्वत:च्या पायावर उभं राहणं हा शिक्षणाचा उद्देश. ते शिक्षण, ज्ञान आपण शेती, व्यवसायापासून तांत्रिक उद्योगापर्यत कुठेही उपयोगात आणू शकतो. शिक्षण म्हणजे केवळ नोकरी हा समज चुकीचा आहे. पाल्य अभ्यासात मागे पडत असेल तर समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्या सोडवणे हे घरातील मोकळ्या संवादाने शक्य आहे. घरात विचारांचे आदानप्रदान झाल्यास बऱ्याच समस्या सहज सुटतात. मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वातंत्र्य दिले तर ते प्रगती करतील. पालकांनी स्वत:च्या अपेक्षा मुलांवर लादल्या तर पाल्य गुदमरून जाईल. यामुळे पाल्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही. शालेय जीवनात पाल्यांना कमी गुण मिळाले, ते अपयशी झाले तरी ते भविष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतात. अशा वेळी त्यांना पालकाच्या पाठबळाची आवश्यकता असते. पाल्यांना धीर देणे गरजेचे आहे. पालकांनी असे केल्यास पाल्य नवीन ऊर्जेने काम करतील.पाल्यामधलं वेगळेपण पालकांनी शोधून त्यांचं करिअर घडवावं. वाटा खूप आहेत, फक्त त्या पालकांना शेाधाव्या लागतील. जीवन खूप सुंदर आहे. प्रत्येकात लपलेला असतो एक सूर्य आवाहन करा त्या सूर्याला, मग येईल तो नवीन पहाट घेऊन कवेत घेऊ त्या सूर्याला आणि जीवनात पसरू आनंदाची लाली कारण जीवन खुप सुंदर आहे.
आपला पाल्य ज्या शाळेत शिकत असेल, तिथले मुख्याध्यापक कदाचित द्वितीय, तृतीय श्रेणीत पास झालेले असू शकतात. पण, ते आज एका शाळेच्या मुख्याध्यापक पदावर आहेत, हे विसरून कसे चालेल? पाल्यांना कमी गुण मिळाले म्हणजे ते दुर्लक्षित, भविष्यात पुढे ते काही करू शकत नाहीत, असा जो पालकांचा दृष्टिकोन असतो, तोच मुळी चुकीचा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.