आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहे खूप होतंय. दर आठवड्याला तीच कहाणी. विमानतळाबाहेरील मोठ्या रांगेमुळे प्रत्येक प्रवाशाला उशीर करते, मग विमान पकडण्यासाठी कुत्र्यासारखे पळावे लागते.’ चांगले तयार होऊन आलेल्या पुरुषांच्या एका गटात मी ही वाक्य ऐकली, जे गेल्या आठवड्यात दिल्ली विमानतळावर विमानात बसण्यासाठी माझ्या मागे येऊन उभे राहिले. ही वाक्ये माझ्यासाठी नवे नाहीत, कारण दिल्ली विमानतळावर गेल्या महिन्यांपासून खूप गर्दी होत असल्याने हे म्हणणे योग्य होते. ते लोकं कोणत्यातरी बहुराष्ट्रीय कंपनीचे यशस्वी एक्झिक्युटिव्ह असतील, जे देशात विविध शाखा कार्यालयांच्या प्रवासात वेळ घालवून कंपनीसाठी व्यवसाय आणत असतील. प्रस्थानाची शेवटची घोषणा झालेली होती आणि या गटाला मी आमच्याकडे इतर लोकांना धक्का देत धावत येताना पाहिले, काहींना श्वास लागल्याने ते पाण्याच्या बाटल्या शोधत होत्या तर काही सहजपणे धावत आले आणि ज्यांना श्वास लागला होता अशांचे साहित्य उचलण्याची तयार दर्शवली. मदत देऊ करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते आणि ज्यांनी मदत घेतली, ते रागात होते, तर ओठातून ‘थँक्य यू’ म्हणाले.
ते सर्व सोबत बसले आणि पूर्ण प्रवासात दिल्ली विमानतळाच्या तुलनेत दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ जसे सिंगापूर, लंडन आणि एखाद्या अमेरिकी विमानतळाशी करत होते, यातून कंपनीतील त्यांचे पद आणि ते किती प्रवास करतात हे स्पष्टपणे समजत होते. त्यातील प्रत्येकांचा मेंदू आवश्यकतेपेक्षा जास्त विचार करत होता की, कसे विमानतळ अधिकारी आणि सीआरपीएफ त्यांची समस्या सोडवू शकतात आणि शासकीय यंत्रणा कुठे चुकत आहेत. जर काही उपाय यंत्रणांपर्यंत पोहोचले तर खरेच मदत होऊ शकत होती. तेव्हा मला जाणवले की, या हुशार लोकांकडे अशा यंत्रणांसाठी उपाय होते, ज्या त्यांच्या व्यवसायाशी संबंधित नव्हत्या, तर त्यांना आपल्या कंपनीसाठी नव्या कल्पनांसाठी त्या हुशारीचा वापर करायला हवा होता. मात्र त्यांचे मन अशांत होते आणि जे आहे ते स्वीकारत नसल्याने असे होऊ शकले नाही. आयुष्यात पूर्णपणे संतुलन होऊ शकत नाही, मात्र आपण कोण आहोत आणि काय करू इच्छितो, या समन्वयासह आयुष्य आपल्या दृष्टीनुसार हवे. आमचा मिडलाइफ एक्झिक्युटिव्ह प्रवास सुधारण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे आमचे एकूण आरोग्य कसे मिळवायचे यावर लक्ष केंद्रित करणे. याचा अर्थ असा नाही की, व्यायामशाळेत वेळ घालवायचा आणि आवडीचे पदार्थ टाळायचे, वेळेसोबत लहानसे बदल केल्याने चांगला परिणाम येतो, हे सहज उपाय अंतर्गत शांतता मिळवण्याचे प्रभावी मार्ग आहेत. हे सकाळी लवकर उठणे होऊ शकते, कृतज्ञता दाखवणे, शरीर ताजेतवाने करणे, जेवणात संतुलन, भरपूर झोपणे, नवीन आवड, स्वत:शी सकारात्मक बोलणे, वाईट सवयी असल्यास त्या सोडणे, स्थिरता स्वीकारणे आणि स्वत:बद्दल उदार राहून निश्चितपणे आपण कल्याण मिळवू शकतो. तुम्ही नाकारा वा स्वीकारा, जे आहे ते आहे. जे नाही ते नाही. फंडा असा की, जर मन शांत नसेल तेव्हा समस्या एखाद्या भिंगासारख्या दिसतील. म्हणून स्वीकारा आणि वेळेचे व्यवस्थापन करण्याऐवजी कौतुक करा. कारण वेळ तशीही २४ तास मॅनेज्ड अाहे.
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.