आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Achieving God With The Touch Of The Soul| Article By :Pt. Vijayshankar Mehta

जीवनमार्ग:आत्म्याच्या स्पर्शाने ईश्वरप्राप्ती

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मने जिंकण्याची कला काही लोकांमध्ये जन्मजात असते. आदिगुरू शंकराचार्य हे त्यांपैकी एक होते. एखाद्याच्या बुद्धिमत्तेची पराकाष्ठा पाहायची असेल तर जुन्या काळातील रावण आणि नंतर शंकराचार्य. रावणाने आपल्या बुद्धीचा गैरवापर केला, शंकराचार्यांनी त्याचा चांगला उपयोग केला. त्यांनी आत्मा आणि परमात्म्यावर मोठ्या प्रमाणावर काम केले. त्यांचे सर्व ज्ञान देहाच्या पलीकडे आत्म्याकडे जाण्याची प्रेरणा होती. आपण आत्म्यावर केंद्रित होतो तेव्हा आतून खूप सरळ बनतो.

अंतःकरणात जे काही घडते ते ते प्रकट करू लागतो. पण, असे लोक फार कमी असतात. या दुहेरी व्यक्तिमत्त्वाच्या युगात प्रत्येक माणूस आत वेगळा आणि बाहेर वेगळा आहे. शंकराचार्यांनी म्हटले होते की, शरीर मिळणे (स्त्री किंवा पुरुष होणे) पुरेसे नाही. यापलीकडे जाऊन आत्म्याला स्पर्श करावाच लागेल. पूल ओलांडला तर पूलच ओलांडला जाईल, नदी ओलांडली, असे मानले जाणार नाही. नदी ओलांडण्यासाठी उडी मारावी लागते. त्याचप्रमाणे केवळ शरीर मिळाल्याने भगवंताची प्राप्ती होत नाही, तो आत्म्याच्या स्पर्शाने प्राप्त होतो. पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...