आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:नात्यांचे रेशीमबंध जोडा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही शब्द ज्ञानजन्य असतात, तर काही अनुभवजन्य. आपल्या धर्मग्रंथातील बहुतांश शब्द अनुभवजन्य आहेत. गीता ही पूर्णपणे या प्रवाहाची आहे. कृष्णाने अर्जुनाला अनेक वेळा सांगितले होते की, एकाच शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात, तू ते कशा प्रकारे, कोणत्या अर्थाने घेशील, यावरून त्याचे महत्त्व वाढते. उदा. एक शब्द आहे मतलब. त्याचा साधा आहे अर्थ उद्देश, हेतू, अर्थ, पण त्याच्या मर्यादेपलीकडे थोडेसे बघितले तर त्याचा एक अर्थ स्वार्थ असाही आहे.

महत्त्वाचं म्हणजे आपण जीवनातील घटनांना, व्यक्तींना शब्दांप्रमाणे कसे घेतो, ज्ञानजन्य की अनुभवजन्य? एखादी व्यक्ती तुम्हाला ज्ञान देऊ शकते, परंतु अनुभव देऊ शकणार नाही आणि असाही कोणी असेल जो भरपूर अनुभव देईल, परंतु ज्ञानात कमकुवत असेल. कोणाकडून, कसे आणि काय घेत आहोत याची आपण तयारी केली पाहिजे. अनुभवासाठी असे म्हटले जाते की, ज्याद्वारे आपण दोन टोकांना जोडू शकतो असा हा एक धागा आहे. विशेषत: कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा अनुभव घ्या, नात्यांचे रेशीमबंध जोडा, मग मतलब या शब्दाचा अर्थच बदलेल.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...