आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:जीवनाला अध्यात्माची जोड आपल्याला निर्भय बनवेल

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जे घाबरतील त्यांना सगळे घाबरवतील आणि जे निर्भय आहेत ते कधीही वर्चस्व गाजवतील. भूत-प्रेतांबाबत फार पूर्वीपासून समज आहेत. ते असतात की नाही, यावर वाद घालू नका, परंतु मानवाने का घाबरावे यावर चर्चा करा. फक्त धर्माशी जोडलेले असाल तर कधी कधी धर्मही घाबरवतो. धर्माचा पुढचा टप्पा व परिपक्व अवस्था म्हणजे अध्यात्म. धर्माचा संबंध शरीराशी, तर अध्यात्माचा आत्म्याशी आहे. अध्यात्माशी जोडला जाईल तो निर्भय होईल. आजकाल आपल्या देशात, अगदी जगातील अनेक विकसित देशांतही भूतबाधित जीवनाची खूप चर्चा होते. प्रसारमाध्यमांद्वारे अनपेक्षित घटना अतिशयोक्तीने दाखवल्या जातात. काही म्हणतात, वस्तू आपोआप हलतात. वरची हवा लागल्याचे काहींचे म्हणणे असते. माणसाची भीती त्याच्या मनोदशेला कशी दृश्यात बदलते. हनुमान चालिसामध्ये एका ओळीत लिहिले आहे, ‘भूत पिशाच निकट नहीं आवे। महावीर जब नाम सुनावे।’ याचा सरळ अर्थ असा आहे की, तुम्ही एखाद्या परम शक्तीशी जोडलेले असाल, जी तुमच्यामध्ये आहे, जी कदाचित आत्म्याची शक्ती असू शकते, तर तुम्हाला या सर्व गोष्टींपासून आपोआप मुक्ती मिळेल. पण भूत-पिशाच असतात असे कोणी मानत असेल तर समजून घ्या की, आपले दुर्गुण हेच सर्वात मोठे भूत-पिशाच आहेत आणि आपण त्यांच्यापासून सुटका करून घेतली पाहिजे.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com

Facebook:Pt. Vijayshankar Mehta