आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा विचार:एआयमध्ये प्रगती करणे आता आपल्यासाठीसुद्धा आवश्यक

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज एआयपेक्षा दुसरे कोणतेही क्षेत्र हाॅट नाही. चॅटजीपीटी लाँच झाल्यापासून या क्षेत्रातील उत्साह आणि जल्लोष नवीन उंचीवर गेला आहे. चॅटजीपीटी हे एक क्वेरी-टूल आहे, ते सर्च-इंजिनसारखे काम करते. ते कोणत्याही प्रश्नाला हुशारीने उत्तर देऊ शकते. हे कॉलेज असाइनमेंट करू शकते, काॅम्प्युटर कोड लिहू शकते, पार्टीच्या प्लॅनिंगमध्ये मदत करू शकते आणि तुमची पुढची सुटी कुठे घालवायची हेही सांगू शकते. आम्ही हा स्तंभही चॅटजीपीटी लिहू शकला असता आणि कदाचित त्याने अधिक चांगले लिहिले असते. चॅटजीपीटीचे १० कोटींहून अधिक वापरकर्ते झाले आहेत. त्याने गुगललाही स्वतःचे एआय-क्वेरी टूल लाँच करण्यास भाग पाडले आहे. चिपमेकर्स, सॉफ्टवेअर प्रोव्हायडर्स, इंटरनेट कंपन्या हे सगळेच रिंगणात आहेत. आपण इतिहासाच्या एका महत्त्वाच्या वळणावर आहोत, कारण एआय लवकरच मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकणार आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये तीन धोके आहेत. पहिला, याचा नोकऱ्यांवर परिणाम होईल. प्रश्न असा आहे की, एआय सर्व नोकऱ्या खाईल का? अखेर, एक निष्ठावान आणि हुशार यंत्र तुमचे काम उत्तम प्रकारे करू शकते, तेव्हा कोणी त्रासदायक माणसांना का कामावर ठेवेल? दुसरा, यामुळे अधिक असमानता निर्माण होईल, कारण श्रीमंत देश जगावर वर्चस्व राखण्यासाठी एआयमधील प्रगती वापरू शकतात. तिसरा, भविष्यात यंत्रे मानवांवर नियंत्रण ठेवतील का? ही एक विज्ञानकथा प्रकारची भीती आहे की, एआयद्वारे तयार केलेले स्मार्ट संगणक आणि अल्गोरिदम मानवांना हानी पोहोचवू शकतात का? सर्वात आधी नोकऱ्यांबद्दल बोलूया. काही दशकांपूर्वी संगणक आणि स्वयंचलित यंत्रांनी केले त्याप्रमाणे मानवाकडून केली जाणारी काही कामे एआय हाती घेईल यात शंका नाही. अकाउंटिंग सॉफ्टवेअरने मुनिमांच्या नोकऱ्या काढून घेतल्या होत्या. शिलाई मशीनने हातांनी स्वेटर विणणाऱ्यांना बेरोजगार केले. परंतु, एआय यापेक्षा अधिक जटिल आणि बुद्धिमान कामे करण्यास सक्षम आहे. ते पर्यटन, कायदेशीर, आर्थिक आणि वैद्यकीय सल्ला यासंबंधीची कामेे करू शकते. परंतु, याचा अर्थ असा नाही की, लोक मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या गमावतील, कारण मानवी-स्पर्श आणि भावनिक-कनेक्टची आवश्यकता नेहमीच असते, विशेषतः मार्गदर्शक भूमिकांमध्ये. एआयदेखील मानव घेऊ शकत असलेल्या जबाबदाऱ्या घेऊ शकत नाही. एआय जनरेटेड अॅडव्हायझरी चुकीची ठरली तर कोणाला जबाबदार धरले जाईल? हा लेख एआयने लिहिला असता आणि तुम्हाला तो आवडला नसता तर तुम्ही कोणाला ट्रोल केले असते? दुसरे, श्रीमंत देश वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एआयचा वापर करू शकतात, अशी एक वैध भीती आहे. बहुतांश इंटरनेट इंग्रजीत असल्याने त्याचा पाश्चात्त्य डेटाबेसेसकडे स्पष्ट कल असेल. भारताला या क्षेत्रात काही करायचे असेल तर त्याने स्वतःच्या एआय मॉडेल्सवर काम करायला हवे. पश्चिमेने आपल्यावर एआय लादले तर तो डिजिटल वसाहतवादाचा एक प्रकार असेल. तिसरे, भविष्यात एआय विकसित होऊन मानवांना नियंत्रित करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. कारण बुद्धिमत्तेवर सैद्धांतिकदृष्ट्या कोणतेही बंधन नाही, ते सतत स्वतःमध्ये सुधारणा करत असते. एआय सुपर-इंटेलिजन्सपर्यंत पोहोचू शकते, ते मानवाच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. एआय-आधारित प्रणालींनी जग चालवण्यास सुरुवात केली तर त्या आपल्याला मागे टाकणारे निर्णय घेण्यास सुरुवात करतील. पण, नजीकच्या भविष्यात तसे होण्याची शक्यता नाही. कारण मानवी मन हे अतिशय गुंतागुंतीचे आहे आणि त्यात बुद्धिमत्तेव्यतिरिक्त इतर क्षमता आहेत. आपण गोष्टींवर आधारित अनुभवू शकतो आणि अनपेक्षित मार्गांनी प्रतिक्रिया देऊ शकतो. पुरेशी झोप घेणे किंवा न घेणे हे तुमचे वर्तन बदलू शकते. ही मानव असण्याची भावनिक अवस्था आहे, ती आपल्या शारीरिक स्थितीशी संबंधित आहे. आपले अनेक निर्णय यावर आधारित असतात. भावनांत वाहून गेल्यावर माणसे मूर्खपणाची कामे करू शकतात. तसेच बुद्धिमत्तेचा संबंध अनिवार्यपणे सत्तेशी नसतो. एआयचे संचालन इतर बुद्धिमान यंत्रांऐवजी श्रीमंत आणि शक्तिशाली मानवांच्या हातात राहील, हे खूप शक्य आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

चेतन भगत इंग्रजीतील कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com

बातम्या आणखी आहेत...