आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजा गतिकीकरणानंतर प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था संपूर्ण जगाशी जोडली गेली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगाचा एकूण जीडीपी वाढीचा दर २.२% या ३० वर्षांच्या नीचांकी पातळीवर येईल. भारत आणि चीन उगाच विदेशी भांडवल गुंतवणूकदारांसाठी गालिचे पसरत नाहीत. म्हणूनच जगातील प्रत्येक देश इतर देशांच्या सामाजिक-आर्थिक-राजकीय परिस्थितीवर सतत लक्ष ठेवतो. एखाद्या देशाची आर्थिक तूट वाढत असेल तर परकीय भांडवल येत नाही आणि ते आले नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. तंत्रज्ञानाच्या या युगात कोणतेही सत्य क्षणार्धात जगभर प्रसारित होते, हे सरकारनेही विसरू नये. जागतिक बँकेच्या ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’ अहवालात देश ५०-६० क्रमांकांनी वर आल्यावर भारत सरकार जाहीरपणे आपली पाठ थोपटत असेल तर इतर रँकिंगही नाकारता येणार नाही. जगातील मोठमोठी राष्ट्रे भारताची व त्याच्या नेत्याची स्तुती करत आहेत आणि निवडणुकीच्या वेळी त्याचा उपयोग जनतेवर प्रभाव पाडण्यासाठी केला जातो, याचा अभिमान वाटतो, पण जर कोणी ग्रेटा थनबर्ग किंवा ब्रिटनची संसद शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल बोलत असेल किंवा जर्मनीचे परराष्ट्रमंत्री काँग्रेस नेत्याच्या शिक्षेबाबत आणि संसदेचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत भाष्य करत असतील, तर त्याला अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप म्हणता कामा नये. यासाठीच जी-२०च्या प्रतिनिधींना भारत भ्रमण करवून देशाची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशाची प्रतिमा कोणी बिघडवण्याने वा निर्माण केल्याने बिघडत नाही. आपण सकारात्मक पैलूंकडे लक्ष दिले पाहिजे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.