आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:प्रत्येक पुरानंतर एक इंद्रधनुष्य उगवते

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बायबलमध्ये नोहाची एक कथा आहे. ज्यात प्रभूने त्याला आणि त्याच्या अनुयायांना वचन दिले की, मानवी कुटुंबाला पुन्हा कधीही पुराचा धोका होणार नाही. असे मानले जाते की प्रभूने नोहाला आशीर्वादाच्या रूपात जो इशारा दिला तो इंद्रधनुष्याचा होता. इंद्रधनुष्य शोधणाऱ्या वेगवेगळ्या लोकांसाठी याचा खोल अर्थ आणि वेगवेगळे महत्त्व आहे. ज्यांच्या आयुष्यात खूप मोठी वैयक्तिक हानी झाली आहे त्यांनी इंद्रधनुष्य पाहिल्यावर मनात खूप खोलवर परिणाम जाणवतो. काही लोकांना वाटते की ते भाग्यवान आहेत आणि देव त्यांना विसरला नाही.

जेव्हा जेव्हा मी मानवनिर्मित समस्यांमुळे निर्माण झालेला पूर (वाचा वाईटपणा) पाहतो तेव्हा मला माझ्या लहानपणी ऐकलेली ही दीर्घकथा आठवते. मी देशाच्या काही भागात नुकत्याच आलेल्या पुराबद्दल बोलत नाही आहे, मी खरं तर वृक्षारोपणाच्या नावाखाली फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या समस्येविषयी बोलतो आहे. पाऊस सुरू होताच वृक्षारोपण मोहिमेसाठी काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेली रोपे सर्वांनी पाहिली असतील. प्रत्येक प्लास्टिक पिशवीचे वजन १३ ते २० ग्रॅम असते. त्यापैकी बहुतेक पिशव्या कचराकुंडीत जाऊन पृथ्वीवरचे ओझे वाढवतात. पण या एकाच स्रोतातून प्लास्टिकचा पूर आला. याची दखल क्वचितच लागवड करणाऱ्यांनी घेतली असेल. माझ्यासाठी या समस्येचे इंद्रधनुष्य (निराकरणाचे वचन देणे) ए श्रीजा (१४) होती. जी २०२० मध्ये तिचे मुख्याध्यापक अगस्तीयेनकडे धावली आणि म्हणाली की, हे बायोडिग्रेडेबल नाहीत आणि पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात. असे होऊ देऊ नये. अगस्तीयेनने संयमाने तिची पर्यावरणविषयक जाणीव ऐकून घेतली. तेव्हापासून ती सोडवण्यासाठी टीम तयार झाली. आज या समस्येचे निराकरण केवळ तिच्या तेलंगणातील जोगुलबा गडवाल जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नाही (२०१६ पर्यंत महबूबनगर म्हणून ओळखले जायचे) तर ते देशभरात ओळखले जाते.

तत्कालीन जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आता १६ वर्षांची आहे आणि श्रीजा ग्रीन गॅलेक्सी या कंपनीची सीईओ आहे. ती कंपनी शेंगदाणा शेंगाच्या सालीपासून बायो-पॉट्स बनवतेे. तेलंगणा सरकारच्या आयटी आणि ई अँड सीच्या टी-वर्क्स विभागाला असे वाटले की, श्रीजाच्या कल्पनेत वृक्षारोपणाची पद्धत पूर्णपणे बदलण्याची क्षमता आहे. यातून हा समाज पूर्णपणे प्लास्टिकमुक्त होऊ शकतो. ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवता यावी म्हणून कंपनीने मशीन बनवण्याचे कामही केले. महिन्याला १०,००० भांडी बनवणाऱ्या मशीनचा नमुना त्यांनी तयार केला. ही बातमी उद्योगात वणव्यासारखी पसरली आणि उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि बायोप्रोसेससाठी निधी देण्यासाठी जीई अप्लायन्सेस पुढे आले. श्रीजाचे कुटुंब, ज्यांना सुरुवातीला आपले मूल मातीशी खेळून काही भांडी शिकत आहे असे वाटायचे. आता एक आयडिया ज्या पद्धतीने पुढे जात आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. आज पृथ्वी अशा प्लास्टिक आणि मानवनिर्मित आपत्तींनी भरडली जात असताना या वृक्षारोपण व्यवसायात श्रीजाचा बायो-पॉट नक्कीच इंद्रधनुष्य आहे. ज्यांना स्वतः भांडे बनवायचे आहेत त्यांच्यासाठी त्यांची कंपनी लिक्विड पेस्ट देखील देऊ शकते.

फंडा असा की, मुले ही ईश्वराचा अवतार आहेत, असे वाटत असेल तर त्यांना प्रोत्साहन द्या आणि मदत करा. कारण पुढच्या पिढीमध्ये ते पृथ्वीच्या सर्व समस्यांचे ‘इंद्रधनुष्य’ बनू शकतात.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...