आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:सरकारी सेवेतील नवा आयाम ठरेल ‘अग्निपथ’

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिन्ही दलांतील लष्करी अधिकारी, मनुष्यबळ तज्ज्ञ आणि जगातील इतर देशांच्या परिस्थितीवर दोन वर्षे चर्चा केल्यानंतर लष्करात अधिकारी नसलेल्यांसाठी ‘टूर ऑफ ड्यूटी’ (डीओटी) अग्निपथ नावाने सुरू करण्यात आली आहे. सेवेचा कालावधी केवळ चार वर्षांचा असल्याने तरुणांचा मोठा वर्ग त्यात रस घेणार नाही, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. दुसरी शंका अशी की, लढाऊ कौशल्यासाठी प्रावीण्य आवश्यक आहे, त्यासाठी चार वर्षे कमी आहेत. या दोन्ही शंका निराधार आहेत.

सैन्यात भरतीचे दोन प्रकार आहेत - कायदेशीर बंधनाने (काँस्क्रिप्शन) किंवा ऐच्छिक. इस्रायल, ब्राझील, दक्षिण कोरिया व रशियामध्येही पहिला प्रयोग आणि आतापर्यंत दुसरा भारतात यशस्वी झाला. हे अग्निवीर फक्त २६ महिन्यांचे प्रशिक्षण घेतील हे खरे आहे, तर नियमित निवडीसाठी ४४ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले जाते. परंतु या योजनेत प्रत्येक तीन अग्निवीरांमागे एक नियमित सैनिक, अशी सैन्याची रचना असेल. म्हणजेच ऑन जॉब ट्रेनिंगही मिळत राहील. भारताचे संरक्षण बजेट ५.२५ लाख कोटी रुपये आहे, त्यातील १.२० लाख कोटी केवळ पेन्शनमध्ये जातात आणि आधुनिकीकरणाला खीळ बसत आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. अशा उपक्रमाचे स्वागतच करायला हवे.

बातम्या आणखी आहेत...