आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • AI Can Improve The Quality Of Life Of The Population All Over The World | Article By Rajkumar Jain

दृष्टिकोन:संपूर्ण जगभरातील लोकसंख्येचे जीवनमान सुधारू शकते एआय

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय भविष्य बदलणार आहे. त्याला प्रगतिपथावर अजून बराच पल्ला गाठायचा असला तरी तो त्याच्या गंतव्यस्थानावर आपल्या विचारापेक्षा खूप लवकर पोहोचणार आहे. ते अत्याधुनिक तंत्रज्ञान जगण्याचा मार्ग कसा बदलत आहेत हे जाणून घेणे मनोरंजक तसेच आकर्षक आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, एआय पुढील काही वर्षांत जीवनाचा अविभाज्य भाग बनेल, मानवी बौद्धिक क्षमतेला मागे टाकून बुद्धिमत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचेल. आजच्या एआयमध्ये सर्जनशीलता नाही आणि करुणा किंवा प्रेमाची क्षमता नाही. मानवी सर्जनशीलता वाढवण्याचे हे फक्त एक साधन आहे. परंतु, शारीरिक-मानसिक रचनेच्या मर्यादांमुळे जी कामे करणे मानवाला शक्य नाही, ती अवघड कामे एआयने समृद्ध यंत्रे सहज करतात. एआयमध्ये जगभरातील लोकसंख्येचे जीवनमान सुधारण्याची अमर्याद क्षमता आहे. ज्ञान अभियांत्रिकीपासून सुरू झालेली उत्क्रांतीवादी चौथी औद्योगिक क्रांती, सध्याच्या काळातील नवीनतम आविष्कार एआयच्या आधारे केवळ नवीन उत्पादन-सेवांना प्रोत्साहन देत नाही, तर आपल्या वैयक्तिक जीवनातील कार्यक्षमता आणि आनंद वाढवण्याचे काम करेल. सर्व जीवनोपयोगी प्रणाली भविष्यात अधिक सोप्या आणि सहज उपलब्ध होतील. त्याचबरोबर तांत्रिक नवकल्पनांमुळे कार्यक्षमता-उत्पादकतेमध्ये लाभदायक बदलांसह वस्तू आणि सेवांचे वितरण सुलभ होईल. घरांमध्ये सेल्फ क्लीनिंग रोबोट्सपासून व्हॉइस ऑटोमेशनपर्यंत एआयने वेगाने प्रगती केली आहे. बांधकाम क्षेत्रात एआय पॉवर्ड रोबोटिक ऑब्जेक्ट्स कार्यरत आहेत, भविष्यात ते वास्तुकला, संरचना डिझाइन, बांधकाम व्यवस्थापन इ. देखील आपोआप करू शकतील. आरोग्यसेवा उद्योगात त्याचा वापर मानवी चुका टाळेल. एआय-शक्तीवर चालणारी भविष्यसूचक प्रणाली एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करणारे विविध घटक उदा. जन्मठिकाण, खाण्याच्या सवयी, प्रदूषण पातळी इत्यादी समजून घेऊन आनुवंशिक किंवा जुनाट आजाराच्या पुनरावृत्तीच्या संभाव्यतेचा अंदाज लावून तो पुन्हा होण्याआधी निर्मूलनासाठी प्रतिबंधात्मक उपचार सुचवेल. शिक्षण क्षेत्रात आभासी शिक्षक मानवी शिक्षकांना प्रभावी शिक्षण देण्यासाठी मदत करतील. बँकिंगमधील एआयचे जागतिक व्यावसायिक मूल्य २०३० च्या अखेरीस ३०० अब्ज डाॅलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ज्याप्रमाणे विद्युत ऊर्जेच्या शोधाने जागतिक स्तरावर आमूलाग्र बदलांचा पाया घातला, त्याचप्रमाणे भूक, दारिद्र्य आणि विविध रोगांचे निर्मूलन करण्यात एआय महत्त्वाचे ठरेल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

राजकुमार जैन स्वतंत्र लेखक writerrajindia@gmail.com

बातम्या आणखी आहेत...