आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Allowing GM Seeds Of Mustard Will Revolutionize It | Agralekh Of Divya Marathi

अग्रलेख:मोहरीच्या जीएम बियाण्यास परवानगीने होईल क्रांती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जेनेटिकली मॉडिफाइड (जीएम) मोहरीची लागवड सुरू करण्याच्या शिफारशीला ‘जीईएसी’ या नियामक संस्थेने अखेर मान्यता दिली आहे. आता सरकारला हिरवा कंदील द्यावा लागेल. या परवानगीने अन्नधान्यामध्ये प्रथमच जनता जीएम बियाणे तंत्रज्ञानापासून उत्पादित अन्नपदार्थ वापरणार आहे. स्वावलंबनाचे हे क्रांतिकारी पाऊल म्हणता येईल. या बियाण्याचा वापर करून मोहरीचे उत्पादन दुप्पट होऊ शकते. ज्या देशात खाद्यतेलाच्या वापराच्या ६०% आयातीवर खर्च होतो (१९ अब्ज डाॅलर) अशा देशात सरकारने नवीन जीएम बियाण्यांना परवानगी देण्याची तातडीची गरज आहे. जीएम उत्पादनांमुळे मानवी आरोग्यास कोणतेही नुकसान होते, असे आतापर्यंत कोणत्याही संशोधनात आढळले नाही. इतर सर्व देश त्याचा पुरेपूर वापर करत आहेत. बीटी कॉटनला २०२२ मध्ये परवानगी मिळाली. या निर्णयाचा फायदा असा झाला की, भारत कापसाच्या आयातीपेक्षा मोठा निर्यातदार बनला. त्याच वर्षी जीएम मोहरीचे बी तीन जनुकांच्या संश्लेषणातून तयार केले गेले, परंतु शेतीला व्यावसायिक उत्पादनासाठी परवानगी नव्हती. विशेष बाब म्हणजे जीएम पिकांवर रोग आणि हवामानातील बदलांचा परिणाम होत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुढील वर्षभरात खाद्यतेलाच्या किमती सातत्याने वाढण्याची अपेक्षा आहे, अशा परिस्थितीत सरकारने जीईएसीची शिफारस लवकरात लवकर मान्य करावी.

बातम्या आणखी आहेत...