आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Along With GDP, Other Parameters Should Also Improve | Agralekh Of Divya Marathi

अग्रलेख:जीडीपी सोबतच इतर मापदंडही सुधारले पाहिजेत

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्यावर दोनशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनला मागे टाकून सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपीत (अर्थव्यवस्थेचे प्रमाण) पाचव्या क्रमांकावर आला आहे. मात्र, जेव्हा देशातील दहापैकी नऊ नवजात किमान स्वीकार्य पोषक तत्वांपासून वंचित असतील तर ही खरंच आनंदाची गोष्ट होऊ शकते का? जर याच जीडीपीच्या आधारे निघणारे दरडोई उत्पन्नाच्या ( जे सामान्यत: व्यक्तीची आर्थिक संपन्नतेचे पॅरामीटर आहे) आधारे पाहिल्यास भारत आजही ब्रिटनपासून खूपच लांब आहे. या पेक्षा वेगळी चिंतेची गोष्ट म्हणजे मानव विकास निर्देशांकात (एचडीआय) आपण १८८ देशांमध्ये गेल्या ३२ वर्षांपासून १३०-१३५ च्या मध्ये म्हणजे खूप गरीब सहारातील आफ्रिकेतील देशांच्या जवळपास दिसतो.

एकूणच आपल्याला आपल्या प्राधान्यात फक्त जीडीपी वाढवण्याकडेच लक्ष द्यायला नको तर शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विकासाचा लाभ समान पद्धतीने वाटला जायला हवा. देशात जिनी कोफिशिएंट स्केलवर गरीब– श्रीमंतातील अंतर सतत वाढत आहे, म्हणजे आर्थिक विकासाचा फायदा काहींच्या पुरतेच मर्यादित राहत आहे. जर देशातील एखादा उद्योगपती जगात तिसरे स्थान मिळवतो तेव्हा कुपोषणाची समस्या दूर होत नाही किंवा बेरोजगारीवर नियंत्रण येऊ शकत नाही. सरकारने स्वस्त आणि मोफत अन्नाच्या सर्व योजना चालू केल्या आहेत मात्र, अजूनही शिशूच्या आरोग्याबाबत अपेक्षित सुधारणा झाल्या नाहीत आणि शिक्षणावरील खर्चही मर्यादित आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड (वाढती युवा शक्ती) चा लाभासाठी सुधारणा लगेच कराव्या लागतील.

बातम्या आणखी आहेत...