आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:जीवनशैलीबरोबरच चांगल्या सुरक्षेची हमी वृद्धापकाळात गरजेची

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लाॅकडाऊनपूर्वी काही निवृत्त मित्रांनी मला एक सल्ला दिला होता. निवृत्ती जीवन मुंबई ऐवजी कर्नाटकात बंगळुरूजवळ किंवा तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये घालवावे, असे त्यांनी मला सुचवले. मी त्यांना म्हणालो, आधी तुम्ही तेथे जा. मग काही वर्षांनंतर त्याबद्दल मी विचार करेल. खरेतर माझी त्यांच्याशी नेहमीच चर्चा होत असते. परंतु शनिवारी सकाळी हा विषय आमच्या चर्चेच्या केंद्रस्थानी होता. त्यामागे नॅशनल क्राइम ब्यूरोने वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबद्दल जाहीर केलेली आकडेवारी कारणीभूत होती. त्यानुसार २०२१ मध्ये कर्नाटकात वरिष्ठ नागरिकांवर सर्वाधिक १०८ प्राणघातक हल्ले झाले. यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता. राज्यात अशा ७८ घटना घडल्या. देशभरात ४६७ प्रकरणे नोंदली गेली होती. सुरक्षातज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गुन्हेगारी प्रवृत्तींना वरिष्ठ नागरिक अगदी सोपे सावज असते. एकटे राहणारे किंवा निर्जन ठिकाणी वास्तव्याला असलेल्या वृद्ध दांपत्यांना धोका आहे. बहुतांश प्रकरणांत घरकाम करणारे, नोकर-चाकर, वाहनचालक इत्यादींद्वारे हल्ले झाल्याचे दिसते. चार वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कर्नाटक या यादीत सहाव्या क्रमांकावर होता. तेव्हा केवळ ३८ घटनांची नोंद झाली होती. तामिळनाडू ८१ घटनांसह आघाडीवर होता.

परंतु लॉकडाऊन दरम्यान दक्षिणेतील दोन राज्यांत मोठ्या प्रमाणात वृद्धांना घर बदलावे लागले. कारण १९५०-१९६० च्या दशकात भारतात बेबी बूम पीरियड होता. या कालावधीत मोठ्या संख्येने अपत्यांचा जन्म झाला होता. ते आज ज्येष्ठ नागरिक झालेले आहेत किंवा ही मंडळी निवृत्त झाली आहे. त्यांनी विविध कारणांनी या राज्यांत वास्तव्याचा निर्णय घेतला. उदाहरणार्थ- खानपानाच्या सवयी, जीवनशैलीतील साम्य, हिरवळ, जास्त शिक्षित लोकसंख्या आणि सक्रिय सामाजिक जीवन. परंतु गेटेड-कम्युनिटीमध्ये वास्तव्याला गेलेल्या लोकांचे गुन्हेगारीविषय घडामोडींपासून संरक्षण झाले. कारण अशा नागरिकांना बिल्डरकडून सुरक्षेसंबंधी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. म्हणूनच ते आपल्या घरात सुरक्षित राहिले.

वृद्ध नागरिकांमध्ये ढासळती प्रकृती व शारीरिक क्षमतांविषयी चिंता असते. ती स्वाभाविक म्हटली पाहिजे. परंतु सामाजिक परिस्थिती व सांस्कृतिक विकास इत्यादी गोष्टींची देखील उपेक्षा करता येणार नाही. त्यामुळेच वृद्ध मंडळींना आज आपल्या मुलांपासून स्वतंत्र राहावे असे वाटू लागले आहे. म्हणूनच वृद्ध मंडळींनी आपल्या वयोगटातील तंदुरुस्त असलेल्या लोकांसोबत राहिले पाहिजे. त्यात सुरक्षा, अध्यात्म-साधना, मनोरंजन, स्वच्छ हवा इत्यादी सुविधा असाव्यात आणि त्यांची परस्परांना देवाण-घेवाण करण्याची देखील सोय हवी. एखाद्या देशातील लोकसंख्येपैकी ७ ते १४ % भाग ६५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा असतो तेव्हा त्याला एजिंग सोसायटी असे संबोधले जाते. परंतु हेच प्रमाण १५ ते २० टक्क्यांवर जाते. तेव्हा त्याला एजेड सोसायटी म्हटले जाते. आज चीनमध्ये वृद्धांची संख्या वाढत चालली आहे. २०२५ पर्यंत चीनमध्ये ६५ वर्षांहून जास्त वयाच्या लोकांचे प्रमाण २० टक्क्यांवर पोहोचेल. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा दुसऱ्या क्रमांकाचा देश भारत काही वर्षांनंतर या श्रेणीत समाविष्ट होईल. सध्या देशात वृद्धांचे प्रमाण १३.५ टक्के आहे. फंडा असा- तुम्हाला निवृत्तीनंतरच्या जीवनाचा आनंद घ्यायचा झाल्यास तुमचे सामाजिक जीवन बहरलेले हवे. त्यात आरोग्य सुविधा असाव्यात. कडक सुरक्षा असलेल्या ठिकाणी राहता यायला हवे.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...