आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Alternatives To Increase Agricultural Production Have To Be Considered | Agralekh Of Divya Marathi

अग्रलेख:कृषी उत्पादन वाढवण्याच्या पर्यायांचा विचार करावा लागेल

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक बदल स्वीकारण्यापूर्वी सावध समाजाने त्याची तपासणी, तुलनात्मक अभ्यास आणि अल्प व दीर्घकालीन परिणामांचे काळजीपूर्वक परीक्षण केले पाहिजे. परंतु, अनेक वेळा ही दक्षतेचा अतिरेक होऊन समाजाला अनेक दशके नवीन तंत्रज्ञानाचा लाभ मिळत नाही. कृषी क्षेत्रातील आनुवंशिक बदल (जीएम) तंत्रज्ञानाला एका वर्गाने विरोध केला आहे, तर अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना आणि कॅनडा या तंत्रज्ञानाचा झपाट्याने अवलंब करत आहेत. वाजपेयी सरकारने २००२ मध्ये कापसात जीएम बियाणे पेरण्यास परवानगी देऊन जय जवान, जय किसान या घोषणेला जय विज्ञान जोडून क्रांती सुरू केली. परिणामी, कापसाचे उत्पादन पुढील दहा वर्षांत तिपटीने वाढून जवळपास चार कोटी गाठींवर पोहोचले. गुजरात हे त्याचे सर्वात मोठे लाभार्थी राज्य झाले आणि भारत जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार झाला. दुसरे उदाहरण म्हणजे कृषी क्षेत्रातील आघाडीच्या देशांचे, त्यांनी सोयाबीन, बटाटे, फळे आणि मका यांमध्ये जीएम बियाणे स्वीकारून अनेक दशकांपूर्वी मोठी क्रांती घडवली. भारताकडे ही सकारात्मक उदाहरणे असल्याने केवळ एका विशिष्ट लॉबीचा त्याला सततचा विरोध दुर्लक्षित करावा लागेल. उत्पादन वाढवण्यासाठी सर्व बाबींचा विचार करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...