आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:अॅल्युमिनियम : आरोग्याचा शत्रू

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंपाक घरात वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियम भांड्यांमुळे आरोग्याला हानी पोहोचते. अॅल्युमिनियमचा वापर किती हानिकारक आहे, त्यावर काय उपाय असू शकतात हे जाणून घेऊया...

अन्नाचे पोषण घटकांच्या निवडीवर तसेच ते शिजवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. पण ज्या भांड्यात अन्न शिजवले जाते त्याचा पोषणावरही परिणाम होतो. वास्तविक ज्या धातूच्या भांड्यात अन्न शिजवले जाते त्यातील घटक अन्नामध्ये आपोआप येतात. हेच घटक अन्नातून शरीरात जातात. म्हणजेच अ‍ॅल्युमिनियमची भांडी निष्काळजीपणे वापरली तर ती खूपच हानिकारक ठरू शकतात.

अॅल्युमिनियम वापराचे दुष्परिणाम अॅल्युमिनियमचा मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होतो. स्मरणशक्ती कमी होणे, हाडे कमकुवत होणे, त्वचेवर खाज येणे, कोंडा होणे, पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. जर ते जास्त प्रमाणात वापरले गेले तर मूत्रपिंड निकामी होऊ शकते. कारण अॅल्युमिनियम अन्नातून लोह आणि कॅल्शियमसारखे घटक शोषून घेते. परिणामी त्यांची कमतरता शरीरात निर्माण होते.

ही खबरदारी घ्या - अॅल्युमिनियम बॉक्साइटपासून बनलेले आहे. स्वयंपाक करताना त्याचे कण हळूहळू पोटात जमा होतात. हे कण मूत्राद्वारे बाहेर पडत नाहीत. यामुळे मज्जासंस्था, मेंदूवर वाईट परिणाम होतो. अल्झायमरही होऊ शकतो. शिवाय आंबट पदार्थ अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये कधीच ठेवू नये. - स्वयंपाक करताना खाद्यपदार्थ परतण्यासाठी स्टीलच्या चमच्यांऐवजी लाकडी चमचा वापरा.स्टील किंवा इतर धातूचे चमचे भांड्याच्या आवरणाला खरचटल्याने अन्नासोबत अॅल्युमिनियम शरीरात जास्त प्रमाणात जाते. - या भांड्यांमध्ये उच्च आचेवर स्वयंपाक करणे टाळा. ज्या पदार्थांना शिजण्यास वेळ लागतो ते यात शिजवू नये. - शिजवलेले अन्न दिर्घकाळ अॅल्युमिनियमच्या भांड्यात तसेच ठेवू नका. गरम अन्नामुळे अॅल्युमिनियम धातूकण अन्नाद्वारे जास्त प्रमाणात पोटात जाते. - संशोधकांच्या मते, चहा, कॉफी, आम्लयुक्त पदार्थ, व्हिनेगर आणि संबंधित पदार्थ, चटण्या, टोमॅटो ग्रेव्ही किंवा सॉस इत्यादी अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये बनवू नयेत.

बातम्या आणखी आहेत...