आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवनात पुरुषार्थासोबत सद्गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. बुद्धिमत्ता, नुसते कष्ट करून यश मिळत नाही. यशासाठी त्याची गरज फक्त २०% आहे, उर्वरित ८०% जीवनमूल्ये व गुण असणे आवश्यक आहे. मी सुमारे एक हजार लोकांची आत्मचरित्रे वाचली, त्यांचा हा निष्कर्ष आहे. कौशल्याने व शैक्षणिक पात्रतेने तुमच्यासाठी कितीही दरवाजे उघडले जाऊ शकतात, पण तुमच्यात संस्कार व चारित्र्य असेल तरच ते दरवाजे नेहमी खुले होतील. प्रतिष्ठित पदावरील व्यक्तीला त्याच्या चारित्र्याच्या चुकांमुळे पद सोडावे लागले, अशा बातम्या आपण रोज ऐकतो. अनेक दशके परिश्रम करून तुम्ही आयुष्यात काही मिळवले असेल, पण तुमच्या चारित्र्यामध्ये थोडाही दोष असेल तर सिंहासनावरून खाली यायला क्षणभरही वेळ लागणार नाही.
जीवनात सर्जनशील व्हा, आत्मविश्वास बाळगा. रोज एक नियम बनवा. सकाळी उठून स्वतःला म्हणा, “जोपर्यंत मी धावू शकतो तोपर्यंत मी धावत राहीन. मी धावू शकणार नाही, तेव्हा मी चालेन. पण जेव्हा मला चालताही येणार नाही तेव्हा मी रांगेन. पण मी कधीच थांबणार नाही.’ समुद्रात पाण्याचे थेंब जसे आहेत तसे पैसे कमावण्याच्या आणि वाढण्याच्या अनेक संधी आपल्या आजूबाजूला आहेत. आपण त्या पाहू शकत नाही, कारण आपण अशी दृष्टी निर्माण केलेली नाही. ज्या मोठ्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्यामागे छोटे छोटे अनुभव आहेत. बंगळुरूमध्ये एका तरुणाला भेटलो. इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकणारा तरुण बसस्थानकावर उभा राहून कॉलेजला जात होता. तिथे एक आई आपल्या लहान मुलाला शाळेत सोडायला आली. तिला थोडा उशीर झाला होता, म्हणून घाईघाईने धावत आली, स्कूटर उभी केली आणि मुलाला शाळेच्या बसमध्ये बसवले. मुलाच्या सुरक्षेची काळजी आईला वाटत होती की, तो नीट बसला आहे की नाही, तो शाळेत नीट पोहोचेल की नाही इ. त्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला इथे उभा असताना कल्पना सुचली आणि त्याने एक सॉफ्टवेअर तयार केले. बालकाने सेन्सर्सला स्पर्श केल्यावर त्याच्या आईला संदेश येईल की, तुमचा मुलगा स्कूल बसमध्ये सुरक्षित बसला आहे, तो सीटवर बसताच दुसरा संदेश येईल. मुलांच्या शाळेतील दिवसभराच्या उपक्रमांशी संबंधित संदेश पालकांच्या मोबाइलवर दर अर्ध्या तासाने येऊ लागले. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला. आणखी शाळांनी त्याची अंमलबजावणी केली. एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीला या सॉफ्टवेअरबद्दल माहिती मिळाली, त्यांना वाटले की, यात पुढे चालून भरपूर शक्यता आहेत. मग त्या मोठ्या कंपनीने हे सॉफ्टवेअर त्याच्याकडून ६५ मिलियन डॉलर्समध्ये विकत घेतले. अभियांत्रिकी पदवी पूर्ण होण्यापूर्वीच तो करोडपती झाला होता. फक्त एका कल्पनेने तो करोडपती झाला. त्याच्या जागी आपण असतो तर काय केले असते?
ज्ञानवत्सल स्वामी, प्रेरक वक्ते आणि विचारवंत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.