आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी जिवंत आहे. तुम्हीही जिवंत आहात. हे वाचून तुमचा थोडा गोंधळ होईल की, जिवंत तर आपण सर्व आहोत, यात काय नवीन आहे? पण माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली. आयुष्याचा काहीच उद्देश नाही असे वाटले. जिवंत राहण्याचे कारण निघून गेले आहे. स्वत:ला पराभूत झाल्यासारखे जाणवले. मला वाटते की, आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी असे प्रसंग येतात, जेव्हा सर्वकाही संपल्यासारखे वाटते.
आयुष्य अनुभवातून शिकण्याचे नाव आहे. मी बॉलीवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली तेव्हा एका काळानंतर एकसारख्याच भूमिका मिळत होत्या. मला अभिनेता व्हायचे होते, पण स्वत:चेच व्यंगचित्र झालो होतो. मला काहीतरी नवीन करायचे होते, पण जुन्या पद्धतींची वारंवार पुनरावृत्ती करण्यासाठी मला नियुक्त केले जात होते. माझ्याकडे संधी होती. मी तेच तेच करत पैसा कमवायचा आणि आनंदी राहायचे. तेव्हा मी आयुष्यात काही कठोर निर्णय घेतले. नवे परिमाण शोधण्यासाठी १९९९ मध्ये दक्षिण भारतीय सिनेमाकडे वळलो. बॉलीवूडमध्ये ओळख व सन्मान मिळवल्यानंतर दाक्षिणात्य सिनेमात नव्याने स्थान निर्माण करायचे होते. काही वर्षांनंतर तिथेही वेगळी ओळख बनली. मात्र, काही विशेष पात्र अद्याप दूर होते. मग मी जुन्या मित्रांकडे गेलो. लोकांना फोन केले, पण ते उचलत नव्हते. यापेक्षा कठीण काळ कोणता असेल असे वाटले. तो निराशेचा काळ होता. नैराश्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात येते. मी त्या वेळी एक गोष्ट निश्चित केली. आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगायचे ठरवले. तुम्हाला पराभूत झाल्याची जाणीव होते तेव्हा तुम्ही जगासाठी महत्त्वाचे नाहीत, अशा प्रकारची वागणूक जगाकडून मिळायला लागते. त्याच वेळी तुम्ही आहात...तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल. कुणी तुमचे असणे स्वीकार करो अथवा ना करो, पण तुम्ही आहात. तेव्हा तुम्हाला कळते की हे जग खूप मोठे आहे. जगात भरपूर जागा आहे, खूप शक्यता आहेत, भरपूर लोक आहेत, ते तुमच्यासोबत काम करण्यासाठी तयार आहेत. आणि नव्या प्रकारचे सर्जनशील लोक मला संधी देण्यास तयार झाले.
आज मी तुम्हाला सांगू शकतो की, आज मी वैविध्यपूर्ण व मनासारखे काम करत आहे. आयुष्यात कधी कधी तुम्हाला आशेचे दरवाजे-खिडक्या बंद दिसतात. मात्र, विश्वास ठेवा, अगणित खिडक्या-दरवाजे आहेत, फक्त ते उघडण्यासाठी तुम्ही जिवंत राहणे गरजेचे आहे. माझ्यावर अन्याय झाला, माझा अपमान केला, पण मी हरलो नाही. आयुष्य वाइट आहे, लोकही वाइट आहेत, असा विचार करू नका. त्यांच्या स्वत:च्या गरजा आहेत, विचार आहेत. तुम्ही जिवंत असाल तर स्वत:वर विश्वास ठेवा. मी आनंदी राहू शकतो का, याची परवानगी जगाकडून घेण्याची गरज नाही. मी जिवंत राहण्यास पात्र आहे. यासाठी जगाची परवानगी घेण्याची गरज नाही. तो तुमचा अधिकार आहे. दररोज स्वत:साठी मतदान करा, व्होट फॉर युवरसेल्फ! आपला आनंद, आपल्या अस्तित्वासाठी मतदान करा. त्या लोकांची चिंता करू नका, ज्यांनी तुमच्याकडून आपले समर्थन परत घेतले आहे. मी रोज स्वत:च्या बाजूने मत देतो. कारण मला आणखी एक दिवस स्वत:साठी, स्वत:च्या आनंदासाठी जगायचे आहे. आयुष्याच्या ‘निवडणुकीत’ आणखी कुणाच्या मताची गरज नाही.
आशिष विद्यार्थी प्रेरक वक्ते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.