आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • America's Strategy To Unite Its Asian Allies In A Technology War Against China

पॉवर-गेम:चीनविरुद्ध तंत्रज्ञान युद्धात आपल्या आशियाई मित्रांना एकत्र करण्याचे अमेरिकेचे डावपेच

चीन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेने चीनविरुद्ध तंत्रज्ञान युद्ध सुरू केले आहे. ऑगस्टमध्ये जो बायडेन यांनी चिप्स आणि विज्ञान कायद्यावर स्वाक्षरी केली, त्यामध्ये अमेरिकेत सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देण्यासाठी ५२ अब्ज डाॅलर गुंतवले गेले. महागाई कमी करण्याचा कायदाही याच महिन्यात मंजूर करण्यात आला, त्यामध्ये अमेरिकेत उत्पादित इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देण्याची तरतूद होती. चीनमधून अमेरिकेत पुरवठा साखळी परत आणणे हा त्यामागचा उद्देश होता. ऑक्टोबरमध्ये बायडेन यांनी टेक निर्यातीवर अभूतपूर्व निर्बंध जाहीर केले. चिनी कंपन्यांना अमेरिकन उपकरणे आणि तंत्रज्ञानाने बनवलेले प्रगत सेमीकंडक्टर जगात कुठूनही मिळू नयेत, असा त्यांचा हेतू होता. असे करून त्यांना चीनवर अंकुश ठेवायचा होता तसेच अमेरिकेची क्षमता वाढवायची होती, त्यामुळे ती सैन्य आणि सायबर स्पेसमध्ये पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते.

युद्ध लढणारे सहसा साथीदार शोधतात. यामुळेच अमेरिका आता हळूहळू आपल्या आशियाई मित्रांना चीनविरुद्धच्या तंत्रज्ञान युद्धासाठी एकत्रित करण्यासाठी त्यांच्याकडे झुकत आहे. ते जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान आहेत. तैवान हा जगातील ९० टक्के सेमीकंडक्टरचा उत्पादक आहे. उदा. गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिका तंत्रज्ञानविश्वात जगात मोठे नाव असलेल्या जपानला अमेरिका आणि नेदरलँड्ससोबत त्रिपक्षीय करार करण्यासाठी आग्रह करत आहे. नेदरलँड्समध्ये एएसएमएल आहे, ती चिप-निर्मिती तंत्रज्ञानासाठी मूलभूत महत्त्वाची सामग्री प्रदान करते.

परंतु, अमेरिका समोरासमोरचा लढा म्हणून ज्याकडे पाहत आहे ते त्याच्या आशियाई मित्रांना गोंधळात टाकू शकते. चीनविरुद्धच्या लढाईत अमेरिका त्यांना आपल्या बाजूने उभे करण्याचा प्रयत्न करत आहे हे त्यांना पटत नाही. ते मान्य केल्यास त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. उदा. चिपमेकिंग उपकरणे ही जपानची दुसरी सर्वात मोठी निर्यात आहे आणि त्यातील एकतृतीयांश चीनला जाते. अलीकडेच एका जपानी अधिकाऱ्याने आपल्या अमेरिकन समकक्षाला सांगितले की, तुमची आणि आमची आवड सारखीच आहे, असे नाही.

बातम्या आणखी आहेत...