आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका वृद्ध आईने एकेदिवशी माझ्याशी संवाद साधताना सांगितले की, खाण्यापिण्याचा आनंद मुले असेपर्यंतच राहतो. मुले दूर गेली आणि आनंदही निघून गेला. हे ऐकून मला धक्का बसला. या मातेची अन्नाची चव गेली की मनाची? रस वस्तूंमध्ये होता की भावनांचा? आणि आज अनेक मातांची ही वेदना आहे. आज जेवणात वैविध्य आले आहे, पण आई-वडिलांची उपस्थिती आणि आईच्या हातामुळे जी चव येत होती ती हळूहळू लोप पावत आहे. त्याचा अंतर किंवा जवळिकीशी काहीही संबंध नाही. हा सारा भावनांचा खेळ आहे. म्हणूनच आई-वडिलांपासून दूर असलेल्यांनी दिवसातून एकदा तरी मोबाइलवर बोलणे झाली नाही तरी डोळे मिटून, आई-वडिलांचे चित्र दोन भुवयांच्या मध्ये आणून मानसिक चर्चा करावी. दूर गेलेल्या मुलांबद्दल पालकांना दु:ख नाही, ते दूर जाऊन विसरल्याचे दु:ख आहे. आठवणींची भूक शमवण्यास ही क्रिया खूप उपयोगी आहे.
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.